Corona | मुंबई, पुणे, नागपुरात जिम, थिएटर आणि मॉल बंद

कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोका पाहता सरकारने जिम, थिएटर आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Corona | मुंबई, पुणे, नागपुरात जिम, थिएटर आणि मॉल बंद
Follow us
| Updated on: Mar 14, 2020 | 9:55 AM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूमुळे (Novel Corona Virus) दहशतीच वातावरण आहे. कोरोना या संसर्गजन्य आजाराचा धोका पाहता सरकारने जिम, थिएटर आणि मॉल (Theater-Gym-Mall Closed) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह (Theater-Gym-Mall Closed) बंद ठेवण्यात आले आहेत.

“पुढील आदेशापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, (Theater-Gym-Mall Closed) नागपूर या शहरातील जिम, चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, नाट्यगृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळ अधिवेशनात याबाबतची माहिती दिली होती.

हेही वाचा : Corona | पुण्यात सर्व शाळांना सुट्टी, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये थिएटर्स, जिम बंद : मुख्यमंत्री

यात दहावी आणि बारावी परीक्षेच्या व्यतिरिक्त (CM Uddhav thackeray on Corona) पिंपरी-चिंचवड आणि पुणे या ठिकाणच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबईतील शाळा मात्र नियमित सुरु राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुण्यातील 39 मल्टिप्लेक्स बंद, कोटींचा व्यवसाय ठप्प

सरकारच्या आदेशानुसार, आज पुण्यातील एकूण 39 मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. त्यामुळे या व्यवसायातून दर आठवड्याला होणारी आठ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. शिवाय, (Theater-Gym-Mall Closed) दर आठवड्याला एका थिएटरची उलाढाल 20 ते 25 लाखांच्या आसपास असते. त्यामुळे या व्यवसायाचं मोठं नुकसान होणार आहे. आगामी सूर्यवंशी आणि 1983 या दोन मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर.

मुंबईत शनिवारी थिएटर्ससमोर शुकशुकाट

मुंबईतही सर्व शिएटर्स बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विकएन्ड असूनही मुंबईतील थिएटर्सबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानंतर नागपुरातील जिम बंद

कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून सरकारने जिम, थिएटर आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले. राज्य सरकारच्या निर्देशानंतर नागपुरातील जिम बंद ठेवण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग होवू नये, म्हणून सरकारनं जिम, थेटर आणि मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.

नागपुरात सध्या कोरोनाचे तीन रुग्ण आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊन रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिम बंद (Theater-Gym-Mall Closed) ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

अमेरिकेत कोरोनाची दहशत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा

भटक्यांच्या पंढरीतील मढी यात्रेवर कोरोनाचा प्रभाव, भक्तांच्या संख्येत मोठी घट

कोरोनाची धास्ती, कोल्हापुरात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू

Corona Virus | मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.