LIVE | मराठवाडा पदवीधर निवडणूक, अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख
महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटेड घडामेड फक्त एका क्लिकवर
[svt-event title=”नागपूरच्या जयताळा परिसरात एका झोपडीत आढळून आला महिलेचा कुजलेला मृतदेह” date=”17/11/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूरच्या जयताळा परिसरात एका झोपडीत आढळून आला महिलेचा कुजलेला मृतदेह, चार-पाच दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली असावी असा संशय, मृत महिलेची ओळख पटली नाही, झोपडीतून वास येत असल्याने काल पुढे आला प्रकार, पोलीस करत आहे तपास [/svt-event]
[svt-event title=”अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात शेतकऱ्यांना रत्नागिरी जिल्हा परिषद उभारी देणार” date=”17/11/2020,9:47AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात शेतकऱ्यांना जिल्हा परिषद उभारी देणार, रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय, शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर देणार भाजीपाला बियाणे, जिल्हा परिषदेकडून महाबीजकडे बियाणांची केली मागणी, जिल्हा परिषद फंडातून यासाठी केली निधीची तरतूद [/svt-event]
[svt-event title=”कसारा घाटात रात्रीच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात, चालकासह दोन जण गंभीर जखमी” date=”17/11/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] कसारा : कसारा घाटात रात्रीच्या सुमारास ट्रकचा भीषण अपघात, मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला, चालकासह दोन जण गंभीर जखमी [/svt-event]
[svt-event title=”नागपुरात दोन युवकांच्या हत्या, तिघांना अटक ” date=”17/11/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात काल दोन युवकांच्या हत्या, याप्रकरणी तीन आरोपींना अटक, या हत्या टोळी युद्धातून झाली असल्याचा व्यक्त केला जात आहे संशय, कुणाल चरडे आणि सुशील बावणे असं मृतकांचे नाव, मृतदेह शहराबाहेर कुही फाट्याजवळ आढळून आले [/svt-event]
[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात 2020 च्या ऑक्टोबरपर्यंत 19 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मदत फक्त दोघांना” date=”17/11/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात 2020 च्या ऑक्टोबरपर्यंत 19 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मात्र मदतीसाठी पात्र ठरले 2 , माहिती अधिकारातून पुढे आली माहिती [/svt-event]
[svt-event title=”मराठवाडा पदवीधर निवडणूक, अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख” date=”17/11/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणूक, अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख, राष्ट्रवादीसह भाजपमध्येही अनेक उमेदवारांची बंडखोरी, कोण कोण उमेदवारी मागे घेणार यावर ठरणार प्रस्थापित उमेदवारांचे भवितव्य, उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर स्पष्ट होणार निवडणुकीचं चित्र, उद्यापासून सुरु होणार विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी [/svt-event]
[svt-event title=”पैठण तालुक्यात शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, शेतकऱ्यासह मुलाचा मृत्यू” date=”17/11/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पैठण तालुक्यात शेतकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला, बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यासह मुलाचाही मृत्यू, पैठण तालुक्यातील आपेगाव गावातली घटना, मुलासह शेतकरी शेतात पाणी भरायला गेले असता घडली घटना, अपेगाव परिसरात 8 दिवसांपासून सुरु आहे बिबट्याची दहशत, अशोक आवटे आणि कृष्णा आवटे अशी या घटनेतील मृतांची नावे [/svt-event]
[svt-event title=”शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन, उद्धव ठाकरे सहकुटुंब स्मृतीस्थळावर जाणार” date=”17/11/2020,7:41AM” class=”svt-cd-green” ] मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब दिनांक १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर येणार आहेत [/svt-event]
[svt-event title=” शेगावचे गजानन महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले, दर्शनासाठी ई-पासची आवश्यकता” date=”17/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] बुलडाणा : आजपासून शेगावचे गजानन महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले, सकाळी 5 ते सायंकाळी 8 या वेळेत घेता येणार दर्शन, दर्शनासाठी ई-पासची आवश्यकता, कोरोना नियमांचे काटेकोर पणे पालनही करावे लागणार [/svt-event]
[svt-event date=”17/11/2020,7:35AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]