Lockdown 4.0 Guidelines | महाराष्ट्रासाठी चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर
महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता हे नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील. (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
मुंबई : राज्यासह देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, या लॉकडाऊनची नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने 17 मे रोजी पत्रक काढून लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. त्यानंतर केंद्रानेही त्याच दिवशी लॉकडाऊन वाढवला. (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
मात्र केंद्राने या चौथ्या लॉकडाऊनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता हे नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील.
पुढील गोष्टींना बंदी कायम
1. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार 2. मेट्रोसेवा बंद राहणार 3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन 4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार. केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु 5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार 6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी 7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार 8. सर्व खासगी कार्यालये बंदच राहणार, कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याची खातरजमा मालकांनी करावी. (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
रेड झोनची नियमावली
रेड झोनमधील कंटेन्मेंट झोनचा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल. महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना कंटेन्मेंट झोनविषयी निर्णयाचे अधिकार देण्यात आले आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये एखादी वसाहत, झोपडपट्टी, इमारत, मोहल्ला, इमारतींचा संकुल, गल्ली, वॉर्ड, पोलीस स्टेशनचा भाग, गाव किंवा गावाचा भाग यांचा समावेश होऊ शकतो. त्यापेक्षा मोठा विभाग कंटेन्मेंट झोन घोषित करण्यापूर्वी (संपूर्ण तालुका किंवा महापालिका क्षेत्र) मुख्य सचिवांशी चर्चा करणे बंधनकारक असणार आहे.
रेड झोनमध्ये उघडण्यास बंदी असलेली दुकाने, मॉल, आस्थापना केवळ स्वच्छता, देखभाल-दुरुस्ती किंवा पावसाळ्याच्या पूर्वीच्या कामांसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडता येणार आहे. मात्र निर्मिती किंवा व्यावसायिक वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे.
रात्रीची संचारबंदी
– संध्याकाळी 7 ते सकाळी 7 दरम्यान सर्व सेवा बंद राहणार – अत्यावश्यक सेवा वगळता संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बाहेर पडायला मज्जाव – 65 वर्षांवरील वृद्ध, गरोदर महिला, इतर आजार असलेल्या व्यक्ती तसेच 10 वर्षांखालील मुलांनी घरीच थांबावे. केवळ वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडावे.
राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी विभागणी
- रेड झोनमध्ये मुंबई आणि एमएमआरमधील सर्व महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या महापालिका येणार आहेत. तर उरलेले बिगर रेड झोन क्षेत्रात येईल.
- कंटेंन्मेंमट झोनमध्ये लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी
- कंटेंन्मेंमट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होणार
रेड झोनमध्ये काय सुरु राहणार
– अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने – इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार – स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारुची दुकाने सुरु करता येणार, दारुच्या होम डिलिव्हरी करता येणार – टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार – चार चाकी वाहनामध्ये 1 + 2 – दुचाकीवर एकालाच परवानगी – मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापने साफसफाईसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळात सुरु ठेवू शकतात. – दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरु करण्याची परवानगी – विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी 5 टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली लॉकडाऊन 4 ची नियमावली
- लग्नात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही
- अंतिम संस्कारात 50 पेक्षा जास्त नागरिकांना परवानगी नाही
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे दंडनीय अपराध
- दारू, पान, गुटखा यांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन दंडनीय
- प्रत्येक दुकानात ग्राहकांमध्ये सहा फुटाचे अंतर आणि कमाल पाच ग्राहकमर्यादा
- मास्क घालणे अनिवार्य
- प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाण आणि वाहतुकीत सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य
- लॉकडाऊनचे उल्लंघन करणे कायदेशीर गुन्हा
- वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन
- किमान कर्मचारी कार्यालयात बोलवावेत, थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक
- हात धुणे, सॅनिटायझर याची व्यवस्था करावी
- दोन कर्मचाऱ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळावे
हेही वाचा – Lockdown 4 | महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.
(Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
- पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
- दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
- तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस)
- चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस)
देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते.
संबंधित बातम्या :
Lockdown 4.0 | देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन, शाळा-कॉलेज, मेट्रो-लोकल बंद राहणार