पुणे : राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला (Lockdown Digital Pass Misuse) आहे. या लॉकडाऊनदरम्यान अनेकांना आपपल्या घरी जाण्यात यावं, यासाठी डिजीटल पास देण्यात आले. मात्र पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात दिलेल्या डिजीटल पासचा खाडाखोड करुन प्रवासासाठी दुरुपयोग केल्याचे समोर आलं आहे.
पुण्यात लॉकडाऊन काळात पोलिसांच्या डिजीटल पासचा खाडाखोड करून प्रवासासाठी (Lockdown Digital Pass Misuse) दुरुपयोग केल्याचं आढळून आलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातून राज्यात, जिल्ह्यात किंवा आपल्या मूळ गावी जाण्यासाठी डिजीटल पास दिले जातात. याबाबतची सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिजिटल पास दिला जातो. मात्र या पासवर खाडाखोड करून दुरुपयोग केल्याचं आढळून आलं आहे.
गडचिरोलीच्या एका नागरिकानं 17 मे ते 19 मे रोजी प्रवासाची परवानगी घेतली होती. मात्र त्यांच्याजवळील पासवर 21 मे ते 24 मे अशी तारीख आढळून आली आहे. पासवर फेरफार केल्यानं गडचिरोली पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
तर खाजगी बस चालकाने तामिळनाडूला जाण्यासाठी 22 मे ते 26 मे या कालावधीचा फॉर्म भरला. मात्र 19 मे रोजी तो कोणतीही परवानगी नसताना तामिळनाडूला गेला. त्यामुळे या चालकाचं वाहन जप्त करण्यात आलं आहे.
तर आतापर्यंत चुकीचे आधार कार्ड नंबर नोंदवून पास घेतल्याप्रकरणी यापूर्वी 6 अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे फॉर्ममध्ये माहिती भरताना दक्षता घेऊन माहिती भरावी. तसेच कोणत्या प्रकारचा खोडसाळपणा करू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं (Lockdown Digital Pass Misuse) आहे.
संबंधित बातम्या :
फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार