Maharashtra Lockdown Extension | महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली (Maharashtra Lockdown Extension Till 31 July) आहे.
Maharashtra Lockdown Extension मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे. (Maharashtra Lockdown Extension Till 31 July)
ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांच्या संख्येत वाढ होईल, त्या ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्त अनावश्यक सेवांवर ठराविक भागात निर्बंध घालू शकतात, असेही यात नमूद करण्यात आले आहे. मुंबईसह एमएमआर परिसरात पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगांव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर महापालिका परिसरात अधिक निर्बंध असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एमएमआर परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना, तसेच कार्यालयात जाणाऱ्यांना दूरचा प्रवास करता येणार आहे. खरेदीसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (28 जून) महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सध्याचा लॉकडाऊन 30 जूननंतर उठणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच हा लॉकडाऊन आहे तसा न राहता टप्प्याटप्प्याने यात काही सवलती दिल्या जातील, असंही नमूद केलं. त्यानुसार या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Lockdown Extension Till 31 July)
‘या’ गोष्टींना परवानगी
- सायकलिंग, धावणे, चालणे अशा व्यायामांना परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 5 ते संध्याकाळी 7 या वेळेत खाजगी किंवा सार्वजनिक मैदाने, समुद्र किनारे, बाग इत्यादी ठिकाणी व्यायामाला मुभा असणार आहे.
- केवळ इनडोर स्टेडियममध्ये परवानगी नाही.
- सामुहिक (ग्रुप) अॅक्टिविटीजना परवानगी नाही.
- लहान मुलांसोबत पालकांना थांबणे अनिवार्य असणार आहे.
- केवळ जवळच्या ठिकाणी व्यायाम करण्यास जाण्याची सूचना, मोकळ्या जागेतील गर्दीची ठिकाणे टाळावी.
- सायकलिंग करण्यास अधिक प्रोत्साहन, यातून शारीरिक व्यायामासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळले जाते.
- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत
Maharashtra Government extends lockdown in the state till 31st July. pic.twitter.com/reUYA00uXI
— ANI (@ANI) June 29, 2020
‘या’ गोष्टी बंधनकारक
1. मास्क घालून चेहरा झाकणे अनिवार्य 2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक 3. दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी 4. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नाही, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी नाही 5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध 6. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध
कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना
- सर्व सरकारी कार्यालये गरजेनुसार किमान 15 टक्के कर्मचारी वर्ग किंवा किमान 15 कर्मचारी (जे अधिक असेल ते) यामध्ये काम करतील.
- शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे.
- थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य
- दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाजे यासारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात.
- दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी. (Maharashtra Lockdown Extension Till 31 July)
मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी देण्यात आली आहे.
1. अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार
2. इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री)
3. आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री
4. औद्योगिक कामे
5. खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे
6. होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचन
7. ऑनलाईन/दूरशिक्षण
8. सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
9. सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील
टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक
10. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत. (Maharashtra Lockdown Extension Till 31 July)
11. एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा प्रवास. खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही
12. लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मेळावा मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉलमध्ये घेण्यास परवानगी
13. सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी
14. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरणास परवानगी
15. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात
16. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा
17. जिल्हांतर्गत बस सेवा 50 टक्के प्रवाशांसह
Concerned District Collector and Commissioners of the Municipal Corporations in the state may enforce certain measures and necessary restrictions in specified local areas on the permitted non-essential activities and movement of persons to control #COVID19: Maharashtra Government https://t.co/6QPs5GPtCY
— ANI (@ANI) June 29, 2020
संबंधित बातम्या :
30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?