Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही
Follow us
| Updated on: Jun 29, 2020 | 4:34 PM

Maharashtra Lockdown Extension मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्यात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगीन अगेन‘ अंतर्गत टप्याटप्याने शिथीलता दिली जाणार आहे. (Maharashtra Lockdown Extension Upto 31st July)

कोणत्या गोष्टी बंधनकारक

1. मास्क घालून तोंड झाकणे अनिवार्य 2. सोशल डिस्टन्सिंग – सार्वजनिक ठिकाणी सहा फूट (दो गज) अंतर राखणे बंधनकारक दुकानात पाचपेक्षा जास्त ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी दुकानदारांनी घ्यावी 3. लग्नाला 50 पेक्षा जास्त पाहुणे नकोत, तर अंत्ययात्रेला 50 पेक्षा जास्त माणसांची गर्दी चालणार नाही 4. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध 5. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, पान, तंबाखू याचे सेवन निषिद्ध

कार्यालयासाठी अतिरिक्त सूचना

6. शक्य तितक्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास प्रोत्साहन द्यावे 7. कार्यालयात थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश, सॅनिटायझर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ ठेवणे अनिवार्य 8. दोन शिफ्टच्या दरम्यान, दरवाज्यांसारख्या सर्वाधिक मानवी स्पर्श होणाऱ्या जागा सॅनिटाईझ कराव्यात 9. दोन कर्मचाऱ्यांमध्ये पुरेसे अंतर राहील, दोन शिफ्ट आणि लंच ब्रेकमध्ये गर्दी जमणार नाही, याची काळजी बाळगावी

मुंबई महापालिका आणि एमएमआर क्षेत्र, पुणे अंतर्गत येणाऱ्या सर्व महापालिका, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमध्ये पुढील गोष्टीना मर्यादांसह मंजुरी

1. अत्यावश्यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु राहणार 2. इतर दुकाने संबंधित महापालिकांच्या सूचनेनुसार उघडतील. मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळता सर्व बाजार, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत उघडतील. मद्य दुकाने परवानगी असल्यास उघडतील (होम डिलिव्हरी किंवा प्रत्यक्ष विक्री) 3. आवश्यक आणि इतर वस्तूंची ई-कॉमर्स विक्री करण्यास मंजुरी 4. औद्योगिक कामे करण्यास मंजुरी 5. खाजगी आणि सार्वजनिक बांधकाम साईट, मान्सूनपूर्व कामे करण्यास मंजुरी 6. होम डिलिव्हरी रेस्टॉरंट/किचनला मान्यता 7. ऑनलाईन/दूरशिक्षण याला मान्यता 8. सरकारी कार्यालये (आपत्कालीन, आरोग्य आणि वैद्यकीय, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस, अन्न आणि नागरी पुरवठा वगळता) 15 टक्के किंवा 15 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील 9. सर्व खासगी कार्यालये 10 टक्के किंवा 10 कर्मचारी संख्येने (जे अधिक असेल ते) कार्यरत राहतील

टॅक्सी, कॅब, रिक्षा, चारचाकी – केवळ आवश्यक प्रवासासाठी चालक + 2 दुचाकी – केवळ चालक

10. प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल अशा तंत्रज्ञ यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर याचा वापर करुन काम करावे, गॅरेजची वेळ घेऊन वाहन दुरुस्ती कामे करावीत

11. एमएमआर क्षेत्रा अंतर्गत आवश्यक काम आणि कार्यालयासाठी आंतरजिल्हा (मुंबई-ठाणे इत्यादी) प्रवास करण्यास मुभा. मात्र खरेदीसाठी जवळच्या मार्केटमध्ये जाणे अपेक्षित. अनावश्यक कामासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची मुभा नाही

12. लग्नासंबंधी कार्यक्रमासाठी मोकळ्या जागा, लॉन किंवा नॉन-एसी हॉल यांनाच मान्यता

13. सायकलिंग, रनिंग, वॉक, व्यायाम या सर्व गोष्टींना परवानगी

14. वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण मंजूर

15. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी पेपर तपासणे किंवा निकाल जाहीर करणे या कामासाठी प्रवास करु शकतात

16. केशकर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर यांना नियम पाळून कार्यरत राहण्याची मुभा

17. जिल्हांतर्गत बस सेवा 50 टक्के प्रवाशांसह मंजूर

संबंधित बातम्या : 

30 जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढवला

(Maharashtra Lockdown Extension Upto 31st July)

दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.