Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे (Maharashtra Monsoon May Delay)

Monsoon | महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची चिन्हं, केरळात 5 जूनला धडकण्याचा अंदाज
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 3:27 PM

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनचं (नैर्ऋत्य मोसमी वारे) आगमन लांबण्याची चिन्हं आहेत. केरळात 1 जूनऐवजी 5 जूनला मान्सून धडकणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासह घरात बसूनही उन्हाळ्याचा त्रास सोसणाऱ्या महाराष्ट्राला थोडी आणखी कळ सोसावी लागणार आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सहा ते सात दिवसांनी महाराष्ट्रातही दाखल होतो. यंदा केरळमध्ये उशिरानं आगमन होणार असल्याने महाराष्ट्रातील आगमनही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याची तीव्रता वाढून या भागात चक्रीवादळ घोंगावणार आहे. या वादळी प्रणालीमुळे मान्सूनच्या प्रवाहाला चालना मिळणार असून रविवार (17 मे) सकाळपर्यंतचा 48 तासांमध्ये केव्हाही मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटावर डेरेदाखल होण्यास पोषक स्थिती आहे.

हवामान विभागाने नुकतेच मान्सून आगमनाच्या संभाव्य तारखांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले. यानुसार मान्सून यंदा चार दिवस उशिराने म्हणजेच 5 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. वाऱ्यांचे आगमन चार दिवस मागे पुढे होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे.

‘स्कायमेट’ अंदाज काय?

केरळात मान्सून एक जून रोजी दाखल होण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केला होता. अंदमानच्या समुद्रात 22 मे रोजी मान्सून धडकणार असल्याचा ‘स्कायमेट’चा अंदाज आहे.

केरळमध्ये मान्सून आपल्या निर्धारित वेळेच्या 7 दिवस पुढे-मागे येत असतो. 99 टक्के वेळा केरळमध्ये मान्सूनचे आगमन 25 मे ते 08 जून दरम्यान झाले आहे. गेल्या 10 वर्षात, 2009 मध्ये एकदाच मान्सून सर्वात आधी म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. तर 2016 मध्ये मान्सूनने 8 जूनला केरळमध्ये धडक दिली होती.

हेही वाचा : राज्यात अनेक ठिकाणी वळीव बरसला, पुणे, नगर, नांदेड, जालन्यात जोरदार पाऊस

दरम्यान, केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची वेळ आणि देशाच्या इतर भागांमध्ये मान्सूनचे आगमन यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं ‘स्कायमेट’ने म्हटलं आहे. केरळमध्ये मान्सून लवकर आला, याचा अर्थ आपल्या शहरात मान्सून तितकाच जलद येईल, हा तर्क निराधार असल्याचं ‘स्कायमेट’ने स्पष्ट केलं आहे. (Maharashtra Monsoon May Delay)

छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर अत्यावश्यक

‘कोरोना’चे संकट पावसाळ्याच्या तोंडावरही कायम राहण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने अत्यावश्यक गोष्टींचे निकष बदलले आहेत. छत्री, रेनकोट, प्लास्टिक कव्हर यांचा समावेश आता अत्यावश्यक गोष्टींमध्ये होणार आहे.

महसूल, वने तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने काढलेल्या परिपत्रकात याचा उल्लेख आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत छत्री, रेनकोट आणि प्लास्टिक कव्हर यांना अत्यावश्यक वस्तू म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

(Maharashtra Monsoon May Delay)

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.