मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात जोरदार पावसाने हजेरी (Maharashtra Mumbai Rain Live Update) लावली. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. लोअर परेल, दादर, कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, मुलुंड, भांडुप या ठिकाणी संततधार पाऊस पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचले.
मुंबईत मुसळधार पावसामुळे हिंदमाता, मिलन सबवे, किंग्ज सर्कल, कुर्ला, एस.व्ही. रोड या भागात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडीही पाहायला मिळाली. दरम्यान मुसळधार पावसामुळे मुंबईत सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
त्याशिवाय ठाणे, वसई, विरार, मिरा भाईंदर परिसरात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली. सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.
पुणे शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे. मात्र येत्या काही दिवसात पुणे आणि जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच घाट माथ्यावर अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 7 जुलैपर्यंत अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला (Maharashtra Mumbai Rain Live Update) आहे.
गेल्या 24 तासात जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. कणकवलीतील जाणवली आणि गडनदी या दोन्ही नद्यांना मोठा पूर आला आहे. तसेच कणकवलीत फ्लायओव्हर ब्रिजचे काम सुरु आहे. त्याच्या शेजारीच सर्व्हिस रोडच्या संरक्षण भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. तर कुडाळ मधील मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीलाही पूर आला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
तसेच कुडाळ-माणगाव येथील आंबेरी पुलावर देखील पावसाचे पाणी साचले. यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला. कोकणात सर्वच जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी लावली. चंद्रपुरातील सर्व गावात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली आहे.
जुलैच्या सुरुवातीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोयाबीन पिकाला यामुळे उभारी मिळणार असून कापूस आणि धान पिकांसाठी हा पाऊस नवसंजीवनी ठरणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे सकाळी अर्धा मीटरने उघडण्यात आले. जळगावसह मध्यप्रदेशात पावसाने हजेरी लावल्याने तापी-पूर्णा नद्यांमधून धरणात पाण्याची आवक वाढून जलसाठा निर्माण झाला आहे. सर्वाधिक पाण्याचा प्रवाह हा पूर्णा नदीतून येत आहे. तर नदी परिसरात पाऊस सुरुच असल्याने पाण्याची आवकही वाढत आहे.
त्यामुळे हतनूर प्रशासनाने धरणाचे 6 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. धरणातून 6 दरवाजातून 5086 क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे तापी नदी खळखळून वाहत (Maharashtra Mumbai Rain Live Update) आहे.
वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. नाल्याला आलेल्या पुरात दोन महिला, बारा वर्षीय मुलगा आणि त्याचे आजोबा वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. यातील एक घटना सोनेगाव (आष्टी) येथे शुक्रवारी (3 जुलै) रात्री उघडकीस आली. तर, दुसरी घटना गोजी येथे शनिवारी (4 जुलै) सकाळी उघडकीस आली.
#MumbaiRain – जोरदार पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबलं, मिलन सब वे परिसरात गुडघाभर पाणी, मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस https://t.co/geObg8OTjv @dineshdukhande pic.twitter.com/ElwUgOSm9y
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2020
संबंधित बातम्या :
Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा
Wardha Rain | वर्ध्यात पुरात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू, 12 वर्षीय नातू आणि आजोबाही बुडाले