LIVE – पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीच्या 5 हजार साड्या
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, एकाच क्लिकवर
[svt-event title=”पंढरपूर विठ्ठल मंदिराकडून पूरग्रस्त महिलांना रुक्मिणीच्या साड्या” date=”10/08/2019,5:46PM” class=”svt-cd-green” ] पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्त महिलांना मदतीचा हात. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त महिलांना साड्या देणार. रुक्मिणीमातेला दान स्वरुपात आलेल्या पाच हजार साड्या पूरग्रस्त महिलांना वाटणार. कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांची माहिती [/svt-event]
[svt-event title=”मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगलवाड़ी गावातील लोकांची घोषणाबाजी” date=”10/08/2019,1:46PM” class=”svt-cd-green” ] सांगली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांच्या बचाव कार्य ठिकाणास भेट, त्यावेळी सांगलवाड़ी गावातील लोकांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली, “मुख्यमंत्री तुम्ही सांगलवाड़ीत या आमची परिस्थिती बघा, एवढ्या गाड्याचा ताफा घेऊन तुम्ही आला. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी त्या गाड्या आम्हाला द्या, अशा घोषणा सांगलीवाडीतील लोकांनी दिला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या पायाला पाणीही लागले नाही असा आरोपही संतप्त नागरिकांना केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु होताच मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून निघून गेले. [/svt-event]
[svt-event title=”ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर” date=”10/08/2019,1:39PM” class=”svt-cd-green” ] ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, आज 4 मृतदेह सापडले, स्थानिक तरुण आणि NDRF टीमकडून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु @rahul_zori [/svt-event]
[svt-event title=”अर्थमंत्री निर्मला सीतारमण बेळगाव पूर पाहणी दौऱ्यावर” date=”10/08/2019,12:56PM” class=”svt-cd-green” ] अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण बेळगाव पूर पाहणी दौऱ्यावर …… बेळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्त गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण आज दिल्लीहून बेंगलोर आणि तेथून बेळगावला सकाळी आले आहे बेळगाव साई भवन येथील बेळगाव पूरग्रस्तांची पाहणी करत आहेत बेळगाव दौऱ्यादरम्यान निर्मला सीतारमण शहरातील पूरग्रस्त आसरा केंद्रांना भेट देऊन तेथील माहिती घेत आहेत. त्यानंतर मार्कंडेय नदी, घटप्रभा नदीचा पूल तसेच संकेश्वर,चिकोड्डी, निपाणी येथील पूरग्रस्त परिस्थितीची माहिती घेणार आहेत. [/svt-event]
[svt-event title=”मराठा क्रांती मोर्चा मैदानात” date=”10/08/2019,12:58PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी मराठा क्रांती मोर्चा सरसावला. हजारो ब्लँकेट, कपडे, खाद्यपदार्थ आणि औषधे जमा केली. मदत घेऊन मराठा क्रांती मोर्चाची टीम कोल्हापूर सांगलीकडे रवाना. 9 तारखेपासून सुरू होणारं आंदोलन रद्द करून मदत सुरू केली. स्वयंसेवक म्हणून तीन दिवस मदतकार्य करणार. सेवा केंद्र उभारून आणखी मदत जमवणार [/svt-event]
[svt-event title=”धान्याच्या पाकिटावर नेत्यांचे फोटो” date=”10/08/2019,12:59PM” class=”svt-cd-green” ] पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या धान्याच्या पोत्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आमदार सुरेश हाळवणकर यांचा फोटो [/svt-event]