राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा, 361 पोलिसांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना अत्यावश्यक सेवेतील (Maharashtra Police Corona cases) कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे.
मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना अत्यावश्यक सेवेतील (Maharashtra Police Corona cases) कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी यासारख्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात 361 पोलीस कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे.
मुंबईसह महाराष्ट्रात 361 पोलिसांना कोरोना झाला आहे. आज (3 मे) जवळपास 19 पोलिसांचे (Maharashtra Police Corona cases) रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 342 वरुन 361 वर गेली आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिसांपैकी 49 जण कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर उर्वरित 309 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. तर 3 पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, काल (2 मे) पर्यंत 342 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यात 51 पोलीस अधिकारी आणि 291 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यातील 23 पोलीस अधिकारी आणि 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर उरलेल्या 28 पोलीस अधिकारी आणि 262 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु (Maharashtra Police Corona cases) आहेत.
‘मातोश्री’बाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोना
दरम्यान काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेरील तीन पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. या तिघांनाही सांताक्रुझमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
यापूर्वी मातोश्री परिसरातील चहावाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता, त्यावेळी त्याच्या संपर्कातील तब्बल 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. हे सर्व पोलीस विविध शिफ्टमध्ये मातोश्रीवर ड्युटीसाठी होते. दरम्यान, मातोश्रीवरील चहावाला कोरोनावर मात करुन नुकताच परतला आहे. मात्र आता ‘मातोश्री’बाहेर बंदोबस्ताला असलेल्या आणखी तीन पोलिसांना बाधा झाल्याने, रुग्णसंख्येत वाढ होत आहे.
संबंधित बातम्या :
‘मातोश्री’बाहेरील आणखी तीन पोलिसांना कोरोना, 24 तासात 100 पोलिसांना कोरोना
मुंबई मनपाच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुक्कामाची सोय जवळच्या हॉटेलात