महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण

गेल्या 24 तासात 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1 हजार 206 वर (Maharashtra Police Corona Virus Patient) पोहोचली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ, दोन दिवसात 145 जणांना लागण
Follow us
| Updated on: May 17, 2020 | 5:01 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Maharashtra Police Corona Virus Patient) चालला आहे. गेल्या 24 तासात 66 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 1 हजार 206 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11 पोलिसांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत वाढ होत आहे. आज एका दिवसात 66 पोलिसांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर काल एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 206 वर पोहोचला आहे. सुदैवाने आज एका दिवसात 15 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान आतापर्यंत 125 अधिकाऱ्यांना आणि 1081 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कोरोनाची लक्षण असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत 90 अधिकारी आणि 822 कर्मचारी अशा एकूण 912 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत.

तर 34 अधिकारी आणि 249 पोलीस कर्मचारी असे एकूण 283 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 11 पोलिसांचा मृत्यू झाला (Maharashtra Police Corona Virus Patient) आहे.

राज्यात 1 लाखांहून अधिक गुन्हे दाखल

राज्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे. 22 मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनचा 55 दिवस आहे. तेव्हापासून राज्यात कलम 188 नुसार 1 लाख 09 हजार 394 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 20 हजार 825 व्यक्तींना अटक करण्यात आहे.  58 हजार 764 वाहन जप्त करण्यात आली आहेत. त्याशिवाय हातवर क्वारंटाईनचा शिक्का असलेल्या 676 व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.
तर अवैध वाहतूक करणाऱ्या 1310 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कालावधीत आरोपींकडून 4 कोटी 43 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 38 घटना (Maharashtra Police Corona Virus Patient) घडल्या आहेत.
संबंधित बातम्या : 
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.