“एका पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते, इथे तर तीन पक्षाचं सरकार”; छगन भुजबळ यांचं मोठं विधान

आता सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरुन लॉबिंग सुरु झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदासाठी होणाऱ्या लॉबिंगवरुन एक मोठे वक्तव्य केले आहे.

एका पक्षाचं सरकार असल्यावरही धुसफूस असते, इथे तर तीन पक्षाचं सरकार; छगन भुजबळ यांचं मोठं विधान
छगन भुजबळ, नेते, राष्ट्रवादीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 2:12 PM

महाराष्ट्रात सध्या देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंरबला जाहीर झाले. या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. भाजपचे 132 आमदार निवडून आले. त्यापाठोपाठ शिवसेना 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट) 41 आणि अपक्ष/मित्रपक्षांना 7 जागा मिळाल्या. आता सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरुन लॉबिंग सुरु झाले आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंत्रि‍पदासाठी होणाऱ्या लॉबिंगवरुन एक मोठे वक्तव्य केले आहे.

छगन भुजबळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमी परिसरात जाऊन अभिवादन केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य केले.

“प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार”

“आज लोकशाही मजबूत पायावर उभी राहिली आहे. संविधान आजही अखंड आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. बाबासाहेबांनी सर्व मानव जातीसाठी घटना दिली आहे. बाबासाहेबांच्या संविधानामुळे प्रत्येक व्यक्तीला देशाचा मालक केले आहे”, असे छगन भुजबळ म्हणाले.

“प्रत्येक जण मंत्रीपदासाठी आग्रही”

यावेळी त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “जेव्हा एका पक्षाचे सरकार असते, तेव्हा त्याच्यांत धुसफूस असते. इथे तर तीन-तीन पक्षांचे सरकार आहे. प्रत्येक जण मंत्रीपदासाठी आग्रही आहे. प्रत्येक आमदारांमध्ये मंत्रि‍पदासाठी चढाओढ असते. त्यामुळे प्रत्येक आमदार आपापल्या नेत्यांकडे आग्रह करु शकतात. आता त्यावर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करतील”, असे छगन भुजबळांनी म्हटले.

“देवेंद्र फडणवीसांना पक्षांचे ऐकावे लागले होते”

“संजय राऊतांवर मी काही कमेंट करणार नाही. ते रोज नवीन दावे करत असतात. देवेंद्र फडणवीसांना पक्षांचे ऐकावे लागले होते. थोडे दिवस नाराजी होत असते. पण नंतर त्यांनी काम सुरु केले होते”, असा खुलासा छगन भुजबळ यांनी केला.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.