लोकसभा निवडणूकीनंतर पहिलाच सर्वे, महायुती ? की महाविकास आघाडी ? कोणाची होणार सरसी ?
राज्यभरातून 288 मतदार संघातील 84,529 मतदारांशी संवाद साधण्यात आल्याचे म्हटले जात आहे. तर सर्व्हेक्षण करण्यासाठी सकाळ माध्यमाचे 2000 सहकारी सामील झाले होते. लोकसभा निवडणूकीत मतदान केलेल्यांची प्राधान्याने सर्वेसाठी निवड करण्यात आली आहे....
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूकांच्या पाठोपाठ आता विधानसभा निवडणूकांची तयारी सुरु आहे. या लोकसभा निवडूकांमध्ये जनमताचा कानोसा घेणारे एक सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणात नेमके महाराष्ट्राचा राज्यशकट नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे. यांचा कानोसा घेतला गेला आहे. या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची आता महाविकास आघाडीला सहानुभूती उरली आहे काय ? दोन पक्ष फोडल्यानंतर भाजपाचा अजूनही दु:स्वास केला जात आहे याचा उलगडा किंवा अंदाज आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ? महायुतीचा लाभ कोणाला झाला यावर मतदारांंनी आपली मते मांडली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण घेण्यात आले आहे.
दिवाळीच्या आधी फटाके फूटणार
लोकसभा निवडणूकांचा निकाल 4 जून रोजी लागला. त्यात देशातील मतदारांना भाजपाला संपूर्ण बहुमत दिलेले नसले तरी सत्तेतून बाहेर न काढता आणखीन पाच वर्षांची संधी दिली आहे. तर पार ढेपाळलेल्या कॉंग्रेसला नवीन उर्जितावस्था प्राप्त करुन दिली आहे. त्यामुळे देशा इंडिया आघाडीच्या निमित्ताने सक्षम विरोधी पक्ष दिला आहे. येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात विधानसभेचे पडघम वाजणार आहेत. ऐन दिवाळीच्या आधी या निवडणूका होणार आहेत. या विधानसभा निवडणूकीत कोणाची होणार सरसी याचा कानोसा सकाळ माध्यम समूहाने राज्यव्यापी सर्व्हेक्षणातून घेतला आहे.
कॉंग्रेस आणि एकनाथ शिंदे यांचा फायदा
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात मतदारांची उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला सहानुभूती असली तरी प्रत्यक्षात सर्वाधिक फायदा कॉंग्रेसला झाला आहे. तर महाविकास आघाडीला सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून मिळाले आहे. आणि महायुतीला मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला आहे. या महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघापैकी महाविकास आघाडीचे 30 खासदार जिंकले तर महायुतीला 17 लोकसभा जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रातील ताज्या सर्वेक्षणानूसार महाविकास आघाडीला पुन्हा सहानुभूती मिळालेली असली तरी महायुतीत भाजपा हा पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येणार असल्याचे आकडे सांगत आहेत.
जातीय तेढ वाढत चालल्याने चिंता
महाराष्ट्रात जातीय तेढ वाढत चालली असून स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबणीवर पडून प्रशासकीय अधिकारीच हा कारभार पाहात असल्याने देखील नागरिकांना जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. सर्व्हेक्षणाप्रमाणे महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कल (47.7 टक्के ) आहे. तर पक्ष म्हणून प्रथम क्रमांकाची पसंती ( 28.5 टक्के ) भाजपाला आहे. महाविकास आघाडी यावी असे म्हणणारे मतदारांना महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा कॉंग्रेसला झाला. तर महायुती सर्वाधिक लाभ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला झाला आहे.
सर्वात आवडता पक्ष
मराठा आणि ओबीसीच्या आरक्षण वादाच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ वाढल्याचे 56.6 टक्के मतदारांनी मतदारांनी म्हटलेय, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लांबल्याने गैरसोय झाल्याचे 68.8 टक्के मतदारांनी म्हटले आहे. सर्वात आवडता पक्ष कोणता या प्रश्नावर 28.5 टक्के मतदारांना भाजपच सर्वोत्तम पक्ष असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर अनुक्रमे कॉंग्रेस – 24, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार- 14, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -11.7,शिवसेना – 6, राष्ट्रवादी – 4.2 असा पसंती क्रम आहे.
मुख्यमंत्री कोण हवा ?
विशेष म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदी कोण हवा या पदावर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना समसमान म्हणजे 22.4 टक्के पसंती मिळाली आहे. तर इतर भाजपात देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर कोणता चेहरा मुख्यमंत्री पदी योग्य वाटतो या प्रश्नावर 47.24 टक्के लोकांनी नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे.