महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाच्या नावात बदल, मंत्री नवाब मलिक यांची घोषणा
राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नावात बदल करण्यात आला (Maharashtra Vocational Education Examination Board Name Change) आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे नावात बदल करण्यात आला (Maharashtra Vocational Education Examination Board Name Change) आहे. यानुसार आता हे नाव “महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ” (Maharashtra State Board of Skill Development Examination) असे करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राज्यातील कौशल्य विकासाला गती देणे आणि त्या माध्यमातून बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. कौशल्य विकास विभागामार्फत अधिकाधिक तरुणांना विविध अभ्यासक्रमांमधून प्रशिक्षित करण्यात येईल. तसेच त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येतील असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
सध्या या परीक्षा मंडळांतर्गत विविध गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार सहा महिने कालावधीचे 152 अभ्यासक्रम, 1 वर्ष कालावधीचे 96 आणि 2 वर्ष कालावधीचे 44 अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे एकूण 292 अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम राज्यामध्ये जिल्हा, तालुकास्तरावर, ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या 1 हजार 84 संस्थांमध्ये राबविण्यात येत (Maharashtra Vocational Education Examination Board Name Change) आहेत.
या अभ्यासक्रमांसाठी साधारणपणे प्रतिवर्षी 50 ते 60 हजार विद्यार्थी प्रवेश घेत (Maharashtra Vocational Education Examination Board Name Change) आहे. त्यानुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा या मंडळामार्फत घेण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना शासनाच्यावतीने मंडळामार्फत प्रमाणपत्र देण्यात येते.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
राज्यातील विविध भागातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार आणि स्वयंरोजगारास चालना देण्याच्यादृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यासाठी वरदान ठरतात, हेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
राज्यामध्ये या परीक्षा मंडळाच्या दोन वर्ष कालावधीच्या पूर्ण वेळ स्वरुपाच्या विविध गटातील अभ्यासक्रमांना +2 स्तराची समकक्षता प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतात. तसेच मंडळाचे 1 ते 2 वर्ष कालावधीच्या पूर्णवेळ अभ्यासक्रमांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाशी पर्यायी शैक्षणिक अर्हता म्हणून मान्यता असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीसाठी उपयोग होतो.
त्याचप्रमाणे मंडळाच्या काही अभ्यासक्रमांना भारत सरकारतर्फे शिकाऊ उमेदवारी देखील प्रदान करण्यात आली आहे असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. प्रवेशासाठी इयत्ता दहावी ही शैक्षणिक अर्हता असलेल्या 2 वर्ष कालावधीच्या अभ्यासक्रमांना “पदविका अभ्यासक्रम” (Diploma Course) अशा नावाने प्रमाणपत्र देण्यात येते.
संबंधित बातम्या :
मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक
गणेशोत्सवात चाकरमान्यांना ‘कोकणबंदी’ केली तर आंदोलन, राणे आक्रमक