Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा, गारासंह पावसाचा अंदाज

राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Forecast : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार, आयएमडीचा 9 जिल्ह्यांना इशारा,  गारासंह पावसाचा अंदाज
weather
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 11:58 AM

पुणे : राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा पुणे वेधशाळेकडून देण्यात आला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली,औरंगाबाद या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. त,र काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी

पुणे वेधशाळेकडून राज्यातील 9 जिल्ह्यात पुढील 24 तासात कडाक्याच्या थंडीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धूळे,नंदुरबार, जळगाव,आणि नाशिक, औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही थंडीची लाट

उत्तर महाराष्ट्रासह औरंगाबाद, जालना,परभणी , नांदेड, हिंगोली, या जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

48 तास थंडी कायम राहणार

रविवारी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, कर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. पुढील 48 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा अंदाज

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीच्या वाऱ्यामुळे वातावरणातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. दोन दिवसानंतर पश्चिमी वाऱ्याचा प्रभाव वाढून काही ठिकाणी पाऊस तर गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार असल्याचाही अंदाज हवामान केंद्रान व्यक्त केला आहे.

मुंबईत धूरकट वातावरण

मुंबईत आज पून्हा धूरकट वातावरण तयार झालंय. हवेचा गुणवत्ता निर्देशांक 160 वर आहे. तर काही ठिकाणी हा 187 वर पोहोचलाय. हायवेवर दृष्यमानता काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं.

इतर बातम्या:

मुंबईतली एक झोपडपट्टी ते मायक्रोसॉफ्टच्या प्रॉडक्ट डिझाइन मॅनेजर! वाचा, महिलेचा थक्क करणारा असा प्रेरणादायी प्रवास

Gadchiroli Nagar Panchayat | एटापल्ली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता येणार?, दोन अपक्षांचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra weather forecast IMD Predicted cold wave in nine district of North Maharashtra and Marathwada region

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...