Coronil | महाराष्ट्रात नकली औषधांच्या विक्रीला परवानगी नाही, गृहमंत्र्यांचा रामदेव बाबांना थेट इशारा
महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. (Maharashtra won't allow sale of Pantajalis Coronil)
मुंबई : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील औषध कोरोनिल हे आता बंदीच्या कचाट्यात सापडलं आहे. कारण आयुष मंत्रालयाने जाहिराती थांबवल्यानंतर आधी राजस्थान, मग आता महाराष्ट्र सरकारने या औषधावर बंदी घातली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणीबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही, त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनिल औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं. (Maharashtra won’t allow sale of Pantajalis Coronil)
अनिल देशमुख म्हणाले, “नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जयपूरद्वारे पतंजलीने कोरोनिल या औषधाची वैद्यकीय चाचणी केली होती की नाही याबाबत माहिती घेईल. आम्ही बाबा रामदेव यांना इशारा देतो की आमचं सरकार महाराष्ट्रात नकली किंवा बनावट औषधांच्या विक्रीला परवानगी देणार नाही”
The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved‘s ‘Coronil’ were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won’t allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020
आयुष मंत्रालयाचा आक्षेप
“पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोनावर औषध शोधल्याचं जाहीर केलं आहे. याबाबत आयुष मंत्रालयाला प्रसार माध्यमांद्वारे माहिती मिळाली. या औषधाशी संबंधित वैज्ञानिक दावांचा कोणताही तपशील आयुष मंत्रालयाकडे नाही”, असं आयुष मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
राजस्थानमध्ये बंदी
यापूर्वी आयुष मंत्रालयानेही रामदेव बाबांच्या कोरोनिल या औषधावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर राजस्थान सरकारने या औषधावर बंदी घातली होती. आयुष मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कोणतंही औषध कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वापरलं जाणार नाही, असं राजस्थान सरकारने म्हटलं होतं. जर अशी औषधं विकली तर कारवाई करु, असा इशाराही राजस्थान सरकारने दिला होता.
उत्तराखंड सरकारचा सवाल
उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस पाठवण्याची तयारी केली आहे. उत्तराखंड आयुर्वेद विभागाने नोटीस जारी करत पतंजलीलाला औषध लॉन्च करण्याची परवानगी कोणी दिली, असा सवाल उपस्थित केला आहे.
“पतंजलीच्या आवेदनावर आम्ही परवाना जारी केला. या आवेदनात कुठेही कोरोना विषाणूचा उल्लेख नव्हता. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, कफ आणि तापाचं औषध बनवण्यासाठी परवाना घेत असल्याचं म्हटलं आहे”, अशी माहिती उत्तराखंड आयुर्वेद विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
7 दिवसात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा
योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर पहिलं आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा करत, 23 जून रोजी कोरोनिल हे औषध लाँच केलं होतं. (Ramdev Baba launch Coronil Corona Medicine). या औषधामुळे 100 टक्के रुग्ण बरे होतात आणि 0 टक्के मृत्यूदर असल्याचाही दावा रामदेव बाबा यांनी केला आहे. त्यांनी हरिद्वार येथे या औषधाचं उद्धाटन केलं. श्वासारी वटी कोरोनील असं या औषधाचं नाव आहे.
(Maharashtra won’t allow sale of Pantajalis Coronil)
संबंधित बातम्या
‘पतंजली’ कोरोनील औषधाच्या जाहिरातीवर आयुष मंत्रालयाची बंदी
पतंजलीने आमच्याकडे तर फक्त ताप-खोकल्यावरील औषधाचा परवाना मागितला : उत्तराखंड आयुर्वेद विभाग
पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा