लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग, ‘महाविजय 2024’ बैठकीत निवडणूक रणनितीवर होणार चर्चा

लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला आता वेग आला आहे. 'महाविजय 2024' समितीच्या सदस्यांची आज मुंबईत होणार महत्वाची बैठक होणार आहे. भाजप प्रदेश मुख्यालयात आज सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या बैठकीत मंथन होणार आहे. या बैठकीत लोकसभा , विधानसभा निवडणूकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला वेग, 'महाविजय 2024'  बैठकीत निवडणूक रणनितीवर होणार चर्चा
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 11:37 AM

मुंबई | 15 मार्च 2024 : लोकसभेची यादी जाहीर होताच महाराष्ट्र भाजपच्या तयारीला आता वेग आला आहे. ‘महाविजय 2024’ समितीच्या सदस्यांची आज मुंबईत होणार महत्वाची बैठक होणार आहे. भाजप प्रदेश मुख्यालयात आज सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत या बैठकीत मंथन होणार आहे. या बैठकीत लोकसभा , विधानसभा निवडणूकीच्या रणनितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर हे नेते या बैठकीस उपस्थित असतील.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा आत कोणत्याही क्षणी जाहीर होतील. त्याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. भाजपही निवडणुकीसाठी सज्ज असून भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत दोन याद्या जाहीर झाल्या आहेत. या दोन याद्यांमध्ये राज्यातील अनेक महत्वाच्या उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. दोन दिवसांपूर्वी भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, रक्षा खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांना नागपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसून तयारी सुरू केली असून त्याचाच भाग म्हणून आजची ही बैठक घेण्यात येत आहे. ‘महाविजय 2024’ ही भाजपची एक समिती असून वारंवार अशा बैठका घेत असते. आगामी काळात काय करणं गरजेचं आहे , निवडणूक जिंकून कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने संदेश दिला पाहिजे, या सगळ्याचा लेखाजोगा ही समिती घेत असते. आज सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार असून दुपारपर्यंत ती चालेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. राज्यातील सगळ्या लोकसभा उमेदवारांची तयारी कशी सुरू आहे, याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.