Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?

‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ या कारला ग्राहकांची चांगली पसंती मिळत आहे.

Mahindra THAR चा मार्केटमध्ये धुमाकूळ, तरीही कंपनी कार बंद करण्याच्या विचारात?
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 3:35 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने (Mahindra) गेल्या महिन्यात महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांची लोकप्रिय एसयूव्ही महिंद्रा ‘THAR 2020’ भारतात लाँच केली होती. या ‘सेकंड जनरेशन महिंद्रा THAR 2020’ ची किंमत 9.8 लाख रुपयांपासून सुरु होते. तर महिंद्रा थारचे एलएक्स ट्रिम हे टॉप मॉडेल 13 लाख रुपयांपर्यंत बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. (Mahindra SUV THAR AX Trim model may be closed)

महिंद्राची सेकेंड जनरेशन थार ही एसयूव्ही भारतीयांच्या पसंतीस उतरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तरीदेखील महिंद्राने त्यांच्या 6-सीटर थारची बुकिंग घेणं बंद केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी थार AX ट्रिम व्हेरिएंट बंद करु शकते. थार AX ट्रिम व्हेरिएंटमध्ये साईड फेसिंग सीट्स देण्यात आल्या आहेत. तसेच सोबत लॅप सीट बेल्ट आणि फ्रंट सीट्सवर थ्री पॉइंट सीट बेल्ड देण्यात आला आहे. परंतु याचा कारच्या सेफ्टी रेटिंगवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळेच कंपनी त्यांचं AX ट्रिम मॉडल बंद करण्याच्या तयारीत आहे.

क्रॅश टेस्टमध्ये Mahindra THAR पास

नुकतीच Mahindra THAR ची क्रॅश टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टवरुन क्रॅश टेस्टमध्ये महिंद्राची ही शानदार कार उत्तीर्ण झाली आहे, असे म्हणता येईल. ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर महिंद्रा थारला सुरक्षिततेच्या बाबतीत 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. ग्लोबल NCAP ‘सेफ कार फॉर इंडिया’ मोहिमेंतर्गत घेण्यात आलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही या कारला 4 स्टार्स मिळाले आहेत. क्रॅश टेस्ट रिपोर्ट पाहिल्यानंतर या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती, मिळेल असे बोलले जात आहे.

सेकंड जनरेशन महिंद्रा ‘THAR 2020’ची वैशिष्ट्ये

जुन्या महिंद्रा थारच्या तुलनेत नवीन महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये बऱ्यापैकी कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांसह नवी महिंद्रा ‘THAR 2020’ खरेदी करू शकतात. या नव्या ‘THAR 2020’मध्ये 4 सीट आणि 6 सीट, असे सीटिंग लेआउट पर्याय देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन, असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2.0 लीटर 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन, 150 बीएचपी पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट करते. तर, 2.2 लीटर डिझेल इंजिनने 130 बीएचपीची पॉवर आणि 300 एनएम टॉर्क जनरेट केले जाते. या नव्या ‘THAR 2020’मध्ये बीएस 6 इंजिन देण्यात आले असून, 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

सेकंड जनरेशन महिंद्रा थारच्या उर्वरित वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, 9 वेरियंटसह रेड रेज, गॅलेक्सी ग्रे, मिस्टिक कॉपर, रॉकी बेज, नेपोली ब्लॅक आणि अ‍ॅक्वामरीन या वेगवेगळ्या रंगात ‘THAR 2020’ लाँच केली गेली आहे.

महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये 7 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट, अ‍ॅडजेस्टेबल सीट, रूफ माउंट स्पीकर्स, क्रूझ कंट्रोल, ड्युअल एअरबॅग, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, हिल कंट्रोल, डिजिटल ओडोमीटर, इलेक्ट्रॉनिक मल्टी ट्रिप मीटर, असे फीचर्स देण्यात आले आहेत. महिंद्रा ‘THAR 2020’मध्ये खास चौकोनी एलईडी टेललाईट्स, स्पोक अ‍ॅलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या 

Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Crash Test : टाटा नेक्सॉन, ह्युंदाई वेन्यू ते ईकोस्पोर्ट, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

Mahindra THAR चा जलवा कायम, दिवाळीच्या मुहूर्तावर रेकॉर्डब्रेक विक्री

(Mahindra SUV THAR AX Trim model may be closed)

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.