पुण्याची धाकधूक वाढली, दोन दिवसात 208 नवे कोरोना रुग्ण आणि 8 मृत्यू
शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात कोरोनाचा उद्रेक आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे (Major increase in corona patient in Pune).
पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात कोरोनाचा उद्रेक आता दिवसेंदिवस वाढू लागला आहे (Major increase in corona patient in Pune). पुण्यात आज (24 एप्रिल) सलग दुसऱ्या दिवशी तब्बल 109 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येेेेनं हजाराचा टप्पा पार केला. जिल्ह्यात 109 नवीन रुग्णांची वाढीसह एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1094 वर गेली आहे. तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 67 वर गेलाय.
पुण्यात गुरुवारीही (23 एप्रिल) तब्बल 104 नवीन रुग्णांची संख्या वाढली होती, तसेच चौघांचा मृत्यू झाला होता. अशाप्रकारे पुण्यात 2 दिवसात तब्बल 204 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच दोन दिवसात 8 जणांचा कोरोना संसर्गाने जीव घेतला आहे. असं असलं तरी आज दिवसभरात 16 कोरोना रुग्ण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. या कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला. आतापर्यंत पुण्यात एकूण 140 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात एकूण 41 कोरोना रुग्ण अत्यवस्थ आहेत. तसेच 770 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, शहरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहरातील 3 रुग्णालयांची कोरोना रुग्ण सामावून घेण्याची क्षमता संपली आहे. त्यामुळे आता शहरातील वसतिगृह अधिग्रहित केली जात आहेत. पुण्यातील 74 हॉस्टेल्स, 300 शाळा (Pune Fights Corona) कोरोना रुग्णांसाठी सज्ज केल्या जात आहेत. कोरोना रुग्णांसाठी 74 हॉस्टेलमध्ये 43 हजार रुग्णांची व्यवस्था होऊ शकणार आहे. तर 300 शाळांमध्ये 20 हजार नागरिकांची सोय करण्याचे नियोजन आहे. या व्यतिरिक्त शहरातील 14 खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे.
पुण्याला कोरोनाचा विळखा आखणीच घट्ट होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांमध्ये रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. काल दिवसभरात 104 नवीन रुग्ण वाढल्याने पुणेकरांची चिंता अजूनच वाढली आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर कमी करणे प्रशासनासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.
पुण्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या ही भवानी पेठेत आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भिती आहे. या आठवड्याच्या शेवटी 1500 आणि 15 मेपर्यंत तीन हजार पर्यंत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिलासादायक म्हणजे, मॅथेमॅटिक मॉडेलनुसार अपेक्षित रुग्ण वाढलेले नाहीत.
कोरोना रुग्णांची अद्ययावत आकेडवारी :
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या :
‘पुण्यात कुणीही उपाशी झोपणार नाही’, कागदपत्रं नसणाऱ्यांसाठी शरद भोजन योजना
Pune Corona | 74 हॉस्टेल्स, 300 शाळा सज्ज, पुण्यात कोरोना लढ्यासाठी प्रशासनाची काय काय तयारी?
पुण्यात आझम कॅम्पसची प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत क्वारंटाईनसाठी बहाल, नागरिकांच्या जेवणाचीही सोय
Major increase in corona patient in Pune