मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका, पदभार स्वीकारताच 33 कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हा

कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांनी 33 कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दिली होती. (Malegaon Municipal Corporation Commissioner Trimbak Kasar)

मालेगाव मनपा आयुक्तांचा दणका, पदभार स्वीकारताच 33 कामचुकार कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 5:10 PM

मालेगाव : मालेगाव महापालिका आयुक्तांनी पदभार स्वीकारताच कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. त्र्यंबक कासार यांनी 33 कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ‘कोरोना’बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. (Malegaon Municipal Corporation Commissioner Trimbak Kasar)

मालेगाव महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी 33 कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसात लेखी तक्रार दिली होती. मालेगावमधील किल्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कलम 188 प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.

मालेगाव महापालिकेच्या आयुक्तपदी त्र्यंबक कासार यांची सोमवारी नियुक्ती करण्यात आली होती. किशोर बोर्डे यांच्या जागी कासार यांची वर्णी लागली. कासार हे अमरावतीला जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता शासनाने बोर्डे यांच्या जागी कासार यांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे

मालेगावात कंटेनमेंट झोनमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण 42 भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. दुपारी आलेल्या अहवालात नव्याने 16 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजच्या रुग्णात एसआरपीएफच्या चार जवानांचाही समावेश आहे. सुदैवाने 106 जण निगेटीव्ह ठरले आहेत.

एकट्या मालेगावात कोरोना रुग्णांची संख्या 274 वर गेली आहे. मालेगावात कोरोनाचे आतापर्यंत 12 बळी गेले आहेत. मालेगावात आतापर्यंत 7 रुग्ण बरे होऊन परतले आहेत.

आतापर्यंत एसआरपीएफच्या 27 जवानांसह 46 पोलीस कर्मचारी बाधित झाले आहेत. मालेगावतील 42 कोरोना बाधित पोलिस नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह मालेगावात तळ ठोकून आहेत.

(Malegaon Municipal Corporation Commissioner Trimbak Kasar)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.