Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण

कोरोनामुळे महाराष्ट्रात बाधितांची संख्या वाढत (Pune new corona patient) असताना, दुसरीकडे बरे होणाऱ्या किंवा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.

यकृताच्या उपचारासाठी आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला, पुण्यात नवा रुग्ण
Follow us
| Updated on: Mar 27, 2020 | 12:48 PM

पुणे: कोरोनामुळे महाराष्ट्रात बाधितांची संख्या वाढत (Pune new corona patient) असताना, दुसरीकडे बरे होणाऱ्या किंवा डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. पुण्यात तर कोरोनाबाधितांची (Pune new corona patient) संख्या वेगाने वाढत असताना, थोडसं दिलासादायक चित्र आहे. कारण पुण्यात दोन दिवसात केवळ एकच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने, थोडीशी गती मंदावल्याने दिलासा आहे. सहकार नगर मधील चाळीस वर्षे पुरुषाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हा रुग्ण यकृताच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी दाखल होता. यावेळी व्हेंटिलेटरवर असताना घशाचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्या अहवालात या रुग्णाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं निदान झालं.

विशेष म्हणजे या रुग्णाचा परदेशवारीशी काहीच संबंध नाही. तो गेल्या सहा महिन्यापासून कोणताही कामधंदा करत नव्हता. या काळात तो घरीच आणि परिसरात इतरत्र ये-जा करत होता. त्यामुळे बाहेरच्या संसर्ग असलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे. तो कोणाच्या संपर्कात आला, या रुग्णाला प्रादुर्भाव कसा झाला, याबाबतची माहिती घेतली जात आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील आणि इतर संपर्कात आलेल्या नागरिकांचाही तपास सुरू आहे.

परदेशवारी नसताना शहरातील चार रुग्णांना संसर्ग कसा झाला हे अद्याप समजले नाही. त्यामुळे या चारही व्यक्तींना संसर्ग कसा झाला याबाबत उलगडा झाला नसल्याने आरोग्य यंत्रणाही संभ्रमित झाली आहे.

पुण्यातील कोरोना रुग्ण

पुण्यात कोरोनाचे 20 तर पिंपरी चिंचवडमध्ये 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 136 वर गेली आहे. पुणे-पिंपरीत आतापर्यंत दहा रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांचा वाढता आकडा

महाराष्ट्रात ‘कोरोना’चा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भात आज ‘कोरोना’चे आणखी पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नागपुरात काल सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चौघांना लागण झाली आहे. तर गोंदियातही एक जण कोरोनाग्रस्त झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 136 वर गेला आहे. (Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51 पुणे – 20 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 11 नागपूर – 9 कल्याण – 5 ठाणे – 5 नवी मुंबई – 5 यवतमाळ – 4 अहमदनगर – 3 सातारा – 2 कोल्हापूर – 2 गोंदिया – 1 पनवेल – 1 उल्हासनगर – 1 वसई विरार – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1

एकूण 136

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च नागपूर (1) – 12 मार्च पुणे (1) – 12 मार्च पुणे (3) – 12 मार्च ठाणे (1) – 12 मार्च मुंबई (1) – 12 मार्च नागपूर (2) – 13 मार्च पुणे (1) – 13 मार्च अहमदनगर (1) – 13 मार्च मुंबई (1) – 13 मार्च नागपूर (1) – 14 मार्च यवतमाळ (2) – 14 मार्च मुंबई (1) – 14 मार्च वाशी (1) – 14 मार्च पनवेल (1) – 14 मार्च कल्याण (1) – 14 मार्च पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च औरंगाबाद (1) – 15 मार्च पुणे (1) – 15 मार्च मुंबई (3) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च यवतमाळ (1) – 16 मार्च नवी मुंबई (1) – 16 मार्च मुंबई (1) – 17 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च पुणे (1) – 18 मार्च पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च मुंबई (1) – 18 मार्च रत्नागिरी (1) – 18 मार्च मुंबई (1) – 19 मार्च उल्हासनगर (1) – 19 मार्च अहमदनगर (1) – 19 मार्च मुंबई (2) – 20 मार्च पुणे (1) – 20 मार्च पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च पुणे (2) – 21 मार्च मुंबई (8) – 21 मार्च यवतमाळ (1) – 21 मार्च कल्याण (1) – 21 मार्च मुंबई (6) – 22 मार्च पुणे (4) – 22 मार्च मुंबई (14) – 23 मार्च पुणे (1) – 23 मार्च मुंबई (1) – 23 मार्च कल्याण (1) – 23 मार्च ठाणे (1) – 23 मार्च सातारा (2) – 23 मार्च सांगली (4) – 23 मार्च पुणे (3) – 24 मार्च अहमदनगर (1) – 24 मार्च सांगली (5) – 25 मार्च मुंबई (9) – 25 मार्च ठाणे (1) – 25 मार्च मुंबई (1) – 26 मार्च ठाणे (1) – 26 मार्च नागपूर (1) – 26 मार्च सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च सांगली (3) – 26 मार्च पुणे (1) – 26 मार्च कोल्हापूर (2) – 26 मार्च नागपूर (4) – 27 मार्च गोंदिया (1) – 27 मार्च

एकूण – 136 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य) पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च