VIDEO : दयाळू चोर, महिलेला ATM मध्ये लुटलं, बँक बॅलन्स पाहून पैसे परत केले
बीजींग (चीन) : एक महिला एटीएममध्ये पैस काढण्यास गेली असता, तिला चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पण त्यानंतर या महिलेच्या अकाऊंटमधील बँलेस बघितल्यानंतर चोराने या महिलेचे सर्व पैसे परत केले. सध्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. चीनमधील हेयुआन शहरात या अनोख्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. चीनच्या एका वृत्तवाहिनीने […]
बीजींग (चीन) : एक महिला एटीएममध्ये पैस काढण्यास गेली असता, तिला चाकूचा धाक दाखवत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. पण त्यानंतर या महिलेच्या अकाऊंटमधील बँलेस बघितल्यानंतर चोराने या महिलेचे सर्व पैसे परत केले. सध्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे. चीनमधील हेयुआन शहरात या अनोख्या चोरीचे प्रकरण समोर आले आहे. चीनच्या एका वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नेमकं प्रकरणं काय ?
चीनमधील हेयुआन शहरात राहणारी एक महिला जवळच्या आईसीबीसी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेली होती. तिने तिच्या अकाऊंटमध्ये 2500 युआन म्हणजेच 25 हजार 700 रुपये काढले. त्यानंतर हे पैसे बॅगेत ठेवत असताना एटीएममध्ये अचानक एक चोर शिरला. त्याने या महिलेला चाकूचा धाक दाखवत तिच्याजवळील पैसे मागितले. घाबरलेल्या महिलेने त्या चोराला आपल्याजवळील पैसे दिले.
त्यानंतर या चोराने त्या महिलेला अकाऊंटमधील शिल्लक रक्कम दाखवण्यास जबरदस्ती केली. चोराच्या हातातील चाकूच्या धाकामुळे तिने तिच्या अकाऊंटमधील शिल्लक बॅलन्स दाखवला. तिने बॅलन्स दाखवल्यानंतर त्या चोराला मात्र धक्काच बसला. कारण त्या महिलेच्या अकाऊंटमध्ये एकही रुपया शिल्लक नव्हता. मग काय… या चोराने मोठ्या मनाने महिलेकडून चोरलेली रक्कम परत केली आणि हा चोर हसत हसत एटीएम बाहेर पडला.
चोराने मनाचा मोठेपणा दाखवत चोरलेले सर्व पैसे परत केले असले, तरी पोलिसांनी मात्र या चोराला ताब्यात घेतल आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या या चोराची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पाहा व्हीडिओ :