Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manish Paul Corona | अभिनेता मनीष पॉलला कोरोनाची लागण, शूटींगदरम्यान बाधित

बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. (Actor Manish Paul Tested Corona Positive)

Manish Paul Corona | अभिनेता मनीष पॉलला कोरोनाची लागण, शूटींगदरम्यान बाधित
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 11:47 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि कॉमेडियन मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाली आहे. ‘जुग जुग जियो’ या नव्या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान मनीष पॉल याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मनीष पॉलला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. त्यानंतर त्याने कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (Actor Manish Paul Tested Corona Positive)

टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, मनीष पॉल हा गेल्या काही दिवसांपासून ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाची शूटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतंच तो मुंबईत परतला. त्यानंतर त्यांना तापासारखी लक्षण दिसू लागली. यामुळे खबरदारी बाळगत त्याने कोरोनाची चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे.

मनीष पॉलसह वरुण धवन, नीतू कपूर, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि प्राजक्ता कोळी हे देखील जुग जुग जियो या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. दिग्दर्शक राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या शूटींगदरम्यान वरुण धवन, नीतू कपूर आणि राज मेहता यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले होते.

त्याशिवाय अनिल कपूर आणि कियारा अडवाणी या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात होतं. मात्र त्यांनतर या दोघांनीही कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. सध्या कोरोना झालेले कलाकार कोरोनामुक्त होण्याची वाट बघितली जात आहे. त्यानंतरच चित्रपटाचे पुन्हा शूटींग सुरु करता येणार आहेत.

दरम्यान जुग जुग जियो या चित्रपटात पहिल्यांदा वरुण धवन आणि कियारा हे जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. याआधी या दोघांनी कलंक या चित्रपटातील एका गाण्यात एकत्र दिसले होते. विशेष म्हणजे मनीष पॉल याच्या आतापर्यंतच्या चित्रपटातील हा पहिला बिग बजेट चित्रपट आहे.

या चित्रपटाद्वारे नीतू सिंग या बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. नुकतंच नीतू सिंग यांनी चित्रपटाच्या सेटवरुन एक सुंदर फोटोही शेअर केला होता. (Actor Manish Paul Tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

Shocking : अभिनेत्री दिव्या भटनागरचं निधन, कोरोनामुळे संपली आयुष्याची लढाई

Bigg Boss 14 | माझ्या रशियन बायकोचे हिंदू धर्मांतर, राहुल महाजनच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका
'ते डबडं कुठं पुरून ठेवलंय...', औरंगजेब कबरीवरून जरांगेंची CM वर टीका.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.