‘या’ एका सवयीमुळे जिमला न जाता राहा दीर्घकाळ निरोगी

सकाळी लवकर उठणारी लोक दिवसभर फार उत्साही (benefits of waking up early) असतात.

'या' एका सवयीमुळे जिमला न जाता राहा दीर्घकाळ निरोगी
Follow us
| Updated on: Sep 23, 2019 | 4:46 PM

मुंबई : ‘लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे,’ असे आपल्याकडे अनेकदा सांगितले जाते. जो माणूस सकाळी लवकर उठतो त्याचा संपूर्ण दिवस फार चांगला (benefits of waking up early) जातो. जर तुम्ही तुमच्या नेहमीच्या दिनक्रमात थोडासा फरक केलात, तर तुम्हीही फार खुश राहू शकता. सकाळी लवकर उठणारी लोक दिवसभर फार उत्साही (benefits of waking up early) असतात. त्यांची कार्यक्षमतेतही वाढ होते असे नुकतंच एका रिसर्चमधून समोर आलं आहे.

सकाळी लवकर उठणाऱ्यांचे मानसिक आणि शाररिक आरोग्य नीट राहते. तसेच दिवसभरातील कामं करणाऱ्यासाठी तुम्हाला जास्त वेळ मिळतो. सकाळी शांत वातावरण असल्याने तुमच्या मेंदूत सकारात्मक विचार येण्यास मदत होते. सकाळी लवकर उठल्यानंतर तुम्ही पूर्ण दिवस आरामदायी वाटते. तसेच तुमची दिवसभरातील काम नीट वेळेत पूर्ण होतात.

सकाळी उठल्यानंतर जीममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करु नका. अमेरिकेतील वैज्ञानिकांनुसार, सकाळी 5-10 मिनिटे हलकी-फुलकी व्यायाम केल्याने शरीराला दिवसभर (benefits of waking up early) उर्जा मिळते. सकाळच्या वेळी, योगा किंवा मेडिटेशन केल्याने शरीरात रक्तप्रवाह योग्य प्रमाणात होतो. त्याचा फायदा फुफ्फस आणि मेंदूला होता. त्यामुळे सकाळी मोकळ्या हवेत फिरणे किंवा व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर असते.

दररोज सकाळी उठल्यावर ब्रश करणे गरजेचे आहे. दातांच्या सफाईप्रमाणे तोंडाची सफाई करणे गरजेचे आहे. तोंडाची योग्य रितीने सफाई केल्यामुळे अनेक शाररिक समस्या दूर होता. वैज्ञानिकांच्या मते, सकाळच्या वेळी दातांसोबत जीभेचीही नीट स्वच्छता केली पाहिजे. यामुळे तुम्ही आरोग्याच्या (Health benefits for waking up early morning) तक्रारीपासून दूर राहू शकता.

सकाळच्या वेळी कॅफीन अर्थात चहा-कॉफी पिण्याऐवजी लिंबू पाणी प्या. चहा कॉफी प्यायल्याने अनेकांना फ्रेश वाटतं असलं तरी हे तात्पुरत्या स्वरुपाचे असते. चहा कॉफीमुळे शरीराला विटामिन सी किंवा अन्य पोषकत्त्वं प्राप्त होत नाहीत. मात्र कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील हानिकारक तत्त्वं बाहेर निघून होतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याचा फायदा किडनी आणि यकृताला होतो.

सकाळी उठल्यानंतर अनेकांना मोबाईल फोन, आयपॅड, लॅपटॉप घेऊन बसण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्यासाठी घातक आहे. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी 15 मिनिटे मोबाईलला आपल्यापासून दूर ठेवा. सकाळी उठल्यावर मोबाईल चेक करणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे चुकीचे आहे. हे मानसिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

सकाळी उठल्यानंतर स्वत:साठी वेळ काढा. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी फेसवॉशने आपल्या चेहरा धुवा, बॉडी स्क्रब करा आणि मॉश्च्युरायझरचा वापर करावा. तसेच शरीराची मालिश करणेही आरोग्यासाठी (benefits of waking up early) फायदेशीर आहे. असे केल्याने तुम्हाला दिवसभर ताजेतवाने वाटेल.

सकाळचा नाश्ता योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे नाश्तामध्ये पौष्टीक पदार्थांचा समावेश करा. यात फळ किंवा फळांचा ताजा रस, पोहे, दूध, सुखा मेवा, मोड आलेली कडधान्य, तूप यांचा प्रामुख्याने समावेश करा. सकाळच्या वेळी मैदा किंवा गोड पदार्थ खाणे टाळा.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.