जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ, चीनमधून 324 भारतीय विशेष विमानाने मायदेशी
कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे (Coronavirus affect Many Indians in China).
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. याचा थेट फटका चीनमधील भारतीयांनाही बसला आहे (Coronavirus affect Many Indians in China). कोरोना व्हायरसचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या चीनमधील वुहान शहरात अनेक भारतीय फसले आहेत. यापैकी 324 भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने आज (1 फेब्रुवारी) भारतात आणण्यात आलं. ते सकाळी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) पोहचले (Coronavirus affect Many Indians in China).
Delhi: #CoronaVirus screening will be conducted by a team of doctors at Delhi Airport for all the 324 Indians who have arrived in the Air India special flight from Wuhan (China). Later on, if necessary, they will be put under medical observation. https://t.co/nhLnq2GIz8 pic.twitter.com/NgGep1mM6q
— ANI (@ANI) February 1, 2020
एअर इंडियाने वुहानमध्ये फसलेल्या भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून आज पहिल्या विमान फेरीत 324 भारतीय मायदेशी परतले. या डबल डेकर जम्बो 747 विमानात 15 केबिन क्रू आणि 5 कॉकपिट क्रू सदस्य देखील होते. त्यांच्यामदतीने चीनमधील भारतीयांना पूर्ण देखरेखीखाली भारतात आणण्यात आलं.
क्रू व्यतिरिक्त विमानात प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करुन काळजी घेण्यासाठी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमधील 5 डॉक्टरांचं पथकही होतं. त्यांच्यासोबत एअर इंडियाच्या पॅरामेडिकल स्टाफचा एक सदस्यही सहभागी होता.
Air India Spokesperson: Air India special flight takes off from Wuhan (China) with 324 Indians on board. #Coronavirus https://t.co/kgrd7kTxjT pic.twitter.com/FRDJIo7X3E
— ANI (@ANI) January 31, 2020
दरम्यान, आतापर्यंत कोरोना व्हायरसने (Coronavirus) चीनमध्ये 213 लोकांचा जीव घेतला आहे. तसेच जवळपास 10 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरस भारत, संयुक्त अरब अमीरात, श्रीलंका, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, तिबेटसह अनेक देशांमध्ये पोहचला आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आणीबाणीच्या स्थितीची घोषणा केली आहे.
तिबेटमध्ये गुरुवारी (30 जानेवारी) पहिला कोरोना व्हायरसचा संसर्ग असलेला रुग्ण आढळला. तो चीनमधील हुबई येथून आल्याचंही सांगितलं जात आहे. चीनमधून सुरु झालेला कोरोना व्हायरसचा संसर्ग भारतातही पोहचला आहे. भारतात केरळमध्ये कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे. दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात देखील 6 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या सध्या तपासणी सुरु आहेत.