कोरोनाला रोखण्यासाठी देश सज्ज, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन

जगभरात थैमान घालवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यासाठीच देशभरातील अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे (Complete LockDown in India).

कोरोनाला रोखण्यासाठी देश सज्ज, महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Mar 23, 2020 | 12:00 AM

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालवणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारत सज्ज झाला आहे. यासाठीच देशभरातील अनेक राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे (Complete LockDown in India). या अंतर्गत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगणा आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत 341 रुग्णांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला. यातील 23 जण उपचारानंतर कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. या व्यतिरिक्त 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोना संसर्गित रुग्णांमध्ये 39 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरात आत्तापर्यंत 23 राज्यांमध्ये कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी सज्ज होत संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात कलमा 144 लागू करत जमावंबदीचा निर्णय घेतला आहे. आज (22 मार्च) मध्यरात्रीपासून राज्यात कलम 144 लागू झाल्यानंतर 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. या व्यतिरिक्त त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची उपस्थिती 25 टक्क्यांवरुन 5 टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी नागरिकांकडे सहकार्य करण्याची विनंती केली. अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही कमतरता होणार नाही. त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवेचा उपयोग होईल, असंही त्यांनी नमूद केलं.

तेलंगणामध्ये लॉकडाऊन, 31 मार्चनंतर उच्चस्तरीय बैठकीत पुढील रणनिती

तेलंगणाचे मुख्यमंत्री सी. चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण तेलंगणात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. 31 मार्चनंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली जाणार आहे.

दिल्लीमध्ये कलम 144 लागू, रात्री 9 वाजल्यापासून अंमलबजावणी

दिल्लीतही कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी आज (22 मार्च) रात्री 9 वाजल्यापासून जमावबंदी लागू केली आहे. तेथे 31 मार्चपर्यंत कलम 144 लागू असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः राज्यपालांच्या उपस्थितीत याविषयी माहिती दिली.

दिल्ली पोलिसांचे प्रवक्ते म्हणाले, ‘कलम 144 लागू असताना सर्व सभा, आंदोलनं आणि यात्रांवर बंदी असेल. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, खेळ अशा सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. आठवडी बाजार, भाजीपाला, फळं आणि इतर आवश्यक वस्तू सोडता इतर गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. खासगी पर्यटन कंपन्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

पंजाबमध्ये 7 नवे रुग्ण

पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचे 7 नवी प्रकरणं समोर आली आहेत. पंजाब सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पंजाबमध्ये 21 कोरोना बाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. देशभरात कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यासाठी जवळपास 75 जिल्ह्यांमध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, याची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही.

लॉकडाऊन झालेले राज्ये आणि जिल्हे

महाराष्ट्र – सर्व जिल्हे

दिल्ली – सर्व जिल्हे

तेलंगणा – सर्व जिल्हे

राजस्थान – सर्व जिल्हे

कर्नाटक – बंगळुरू, कलबुर्गी, कोडागू, चिक्काबल्लापूर, म्हैसूर

उत्तर प्रदेश – गाजियाबाद, मुरादाबाद, नोएडा, वाराणसी, लखनौ, रामपूर

बिहार – मुंगेर

मध्य प्रदेश- भोपाल, जबलपूर

केरळ – पथानमिट्ठा, कासरगोद, एरणाकुलम, मल्लापुरम, कन्नूर, कोट्टायम, तिरुवंतपुरम

2 महिन्यांपर्यंत 1 कोटी कुटुंबाना मोफत धान्य

राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. गेहलोत सरकारने राज्यातील 1 कोटीहून अधिक कुटुंबांना 2 महिन्यापर्यंत मोफत धान्य दिलं आहे. त्यामुळे तेथेही जमावबंदी कठोरपणे पाळली जाणार असल्याचं दिसत आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona Virus | पुण्यात 15 जण कोरोनाबाधित, 876 लोक क्वारंटाईन

जनता कर्फ्यूच्या वेळेत वाढ, रस्त्यावर दिसल्यास कारवाई होणार

Complete LockDown in India

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.