मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

औरंगाबाद : 14 जानेवारी हा मराठवाड्यासाठी विशेष दिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 1994 ला औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. आजचा दिवस मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विद्यापीठाची सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (BAMU) अशी ओळख आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी दरवर्षी 14 जानेवारीला […]

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

औरंगाबाद : 14 जानेवारी हा मराठवाड्यासाठी विशेष दिवस आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 1994 ला औरंगाबादमधील मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला देण्यात आलं. आजचा दिवस मराठवाड्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विद्यापीठाची सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (BAMU) अशी ओळख आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अनुयायी दरवर्षी 14 जानेवारीला विद्यापीठ प्रवेशद्वारावर येऊन नामविस्ताराच्या लढ्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. आजच्या दिवशी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलं. मात्र या नामांतरासाठी अनेक जणांना लढा देऊन बलिदानही द्यावं लागलं.

बाबासाहेबांचे मराठवाड्यात वास्तव्य होते. बाबासाहेबांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी जावे लागायचे आणि गरीब मुलांना ते शक्य नसायचे. अखेर 1953 मध्ये मराठवाड्यात पाहिल्या मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.

1958 पासून या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव द्यावं अशी मागणी सुरु झाली. हळूहळू ही मागणी जोर धरू लागली आणि नामांतराचा लढा सुरु झाला. नामांतरासाठी तब्बल 17 वर्षे लढा बाबासाहेबांच्या अनुयायांनी दिला आणि अखेर 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून दर वर्षी बाबासाहेबांचे अनुयायी विद्यापीठ गेटवर येऊन बाबासाहेबांना आणि नामविस्तार लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.