लठ्ठ असल्याच्या टोमण्यामुळे विवाहितेची आत्महत्या

पुणे : कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी केली जात होती. तसेच लग्न झाल्यापासून तू लठ्ठ आहेस या कारणावरुनही तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकला जात होता. अखेर शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे घडली. प्रियांका पेटकर असं आत्महत्या केलेल्या […]

लठ्ठ असल्याच्या टोमण्यामुळे विवाहितेची आत्महत्या
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 9:07 AM

पुणे : कौटुंबिक छळाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. तिच्याकडे माहेरहून पैसे आणण्याची सतत मागणी केली जात होती. तसेच लग्न झाल्यापासून तू लठ्ठ आहेस या कारणावरुनही तिच्यावर घटस्फोटासाठी दबाव टाकला जात होता. अखेर शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना पिंपरी चिंचवडमधील भोसरी येथे घडली. प्रियांका पेटकर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी प्रियंकाचा भाऊ पुष्कराज प्रभुणेने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पती केदार पेटकर, सासू सुरेखा पेटकर, सासरे श्रीकांत पेटकर आणि जगदीश माडीवाला यांच्यावर प्रियंकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे.

मयत प्रियंका पेटकर हिचे 2014 रोजी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या केदार पेटकरसोबत लग्न झाले होते. काही दिवस संसार सुखाचा सुरु होता. परंतु काही दिवसांनी प्रियंकाला तिच्या पतीकडून सतत माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. तसेच प्रियंका लठ्ठ असल्यामुळे तिला वेळेवर जेवण दिले जात नव्हते. तिच्या लठ्ठपणामुळे तिला पतीसह सासरच्या मंडळीकडून सारखे टोमणे मारले जात होते. तिच्यावर घटस्फोट देण्यासाठीही दबाव टाकण्यात येत होता.

सासरकडून होणाऱ्या सर्व त्रासाबद्दल तिने आपल्या माहेरी देखील सांगितले होते. परंतु मुलीचा संसार मोडेल म्हणून प्रियांकाच्या घरचे लोक गप्प बसले, तरी सुद्धा प्रियांकाच्या सासरच्या मंडळींनी तिला त्रास देणे थांबवले नाही. त्यांनतर प्रियंकाचा भाऊ तिला माहेरी म्हणजे भोसरी येथे राहण्यासाठी घेऊन आला. पण ही घटना प्रियंकाच्या मनात घर करून होती. अखेर या त्रासाला कंटाळून प्रियंकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवून टाकली.

या घटनेनंतर प्रियांकाच्या भावाने भोसरी येथे तक्रार दाखल केली आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.