China Face off | “मोदीजी एकाच्या बदल्यात 100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ नको, सर्जिकल स्ट्राइक करा”

चीनी सैन्यासोबत गलवानच्या खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. (Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)

China Face off | मोदीजी एकाच्या बदल्यात 100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ नको, सर्जिकल स्ट्राइक करा
Follow us
| Updated on: Jun 18, 2020 | 9:45 AM

पाटणा : चीनी सैन्यासोबत लडाखच्या गलवानच्या खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले. शहीदांपैकी पाच जवान बिहारमधील होते. पाटणा जिल्ह्यातील बिहटामध्ये राहणाऱ्या सुनील कुमार यांनीही देशासाठी बलिदान दिले. (Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)

“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपण प्रत्येक जवानाच्या प्राणाच्या बदल्यात 100-100 चीनी सैनिकांना ठार मारा, माझ्या शहीद पतीचे बलिदान व्यर्थ जायला नको, चीनवर सर्जिकल स्ट्राइक करा” अशा भावना शहीद सुनील कुमार यांच्या वीरपत्नीने व्यक्त केल्या.

बुधवारी संध्याकाळी शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव विशेष विमानाने पाटणा विमानतळावर आणण्यात आले. बिहटाच्या तारापूर गावात शहीद सुनील कुमार यांचे पार्थिव पोहोचले, तेव्हा संपूर्ण गाव त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा झालं. यावेळी दु:ख, राग आणि अभिमानाची भावना दिसली.

हेही वाचा : एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी

घराच्या अंगणात वीरपत्नी, वीरमाता, आणि अर्धांगवायूग्रस्त वीरपिता शहीद सुनील कुमार यांच्या पार्थिवाला कवटाळून तासनतास रडत राहिले. अखेरच्या प्रवासात रस्त्याच्या कडेला नागरिक हातात तिरंगा आणि फुले घेऊन उभे होते. ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

(Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)

हेही वाचा : Col. Santosh Babu | एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया

शहीद कर्नल संतोष यांच्या आई मंजुळा या दुःखद वृत्तालाही मोठ्या धीराने सामोऱ्या गेल्या. “आता तो मला अम्मा म्हणून हाक मारणार नाही. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दुःख आहे. पण देशासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान दिले, याचा मला अभिमान आहे” असं त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

(Martyr Havaldar Sunil Kumar Last Rites wife demands revenge from China)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.