औरंगाबाद: अतिवृष्टीमुळ मराठवाड्यासह, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील तब्बल 24 लाख 95 हजार 901 हेक्टरवरील पिकांचं प्रचंड नुकसान झाल्याचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयानं तयार केला आहे. या अहवालानुसार एकट्या मराठवाड्यातील तब्बल 35 लाख 69 हजार 400 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 2 हजार 546 कोटी रुपयांची गरज असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. नुकसानाचे पंचनामे पूर्ण करुन मदत अहवाल सादर झाल्यामुळं शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. (Massive loss of 24 lakh hectares of agriculture in Marathwada due to heavy rains)
शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारकडे राज्याचे एकूण ३८ हजार कोटी रुपये येणं बाकी आहे. त्यात निसर्ग चक्रीवादळाचे १ हजार ६५ कोटी, पूर्व विदर्भात आलेल्या पुरासंदर्भात ८०० कोटी आणि जीएसटी परताव्याचा समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. याबाबत केंद्राकडे सातत्यानं पाठपुरावा करुनही ही रक्कम अद्याप प्राप्त झाली नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर राज्यात ऑगस्टपासून अतिवृष्टी सुरु आहे, पण अजूनही पाहणीसाठी केंद्राचं पथक राज्यात आलं नसल्याचं ठाकरे म्हणाले.
10 हजार कोटीचं पॅकेज सरकारनं घोषित केलं. हे पॅकेज पुरेसं नाही. या दहा हजार कोटीच्या पॅकेजमध्ये साधा रुमालही येणार नाही, अशी टीकाही भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडेंनी केली आहे. या पॅकेजने शेतकरी, ऊसतोड कामगारांची दिवाळी कशी गोड होणार? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. सावरगाव इथं आयोजित ऑनलाईन दसरा मेळाव्यात त्यांनी सरकारला हे पॅकेज वाढवण्याची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींंचं पॅकेज जाहीर, पण मदत नेमकी कशी मिळणार?
ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर
शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही, अजून निधी जाहीर करा – पंकजा मुंडे
Massive loss of 24 lakh hectares of agriculture in Marathwada due to heavy rains