Aashutosh Bhakre suicide | नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल

'खुलता खळी खुलेना' या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. Aashutosh Bhakre suicide update

Aashutosh Bhakre suicide | नैराश्यावर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला, उपचारांना प्रतिसाद, तरीही आशुतोषचं टोकाचं पाऊल
Follow us
| Updated on: Jul 30, 2020 | 4:07 PM

नांदेड : ‘खुलता खळी खुलेना’ या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुखचा पती आशुतोष भाकरेने आत्महत्या का केली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आशुतोष भाकरेने बुधवारी 29 जुलैला नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पत्नी मयुरेसोबत ना मतभेद होते, ना त्याला म्हणावी तशी आर्थिक चणचण होती. तरीही आशुतोषने स्वत:चं आयुष्य संपवल्याने, कुटुंबाला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Aashutosh Bhakre suicide update)

आशुतोषने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र त्याला नेमकं कोणतं नैराश्य होतं, याचा उलगडा पोलीस करत आहेत.

आशुतोष हा मागील वर्षभरापासून अपेक्षित असे काम मिळत नसल्याने प्रचंड नैराश्याखाली होता, अशी माहिती सध्या मिळत आहे. त्याची अवस्था बघून त्याच्या परिवाराने मुंबईतील दादर इथल्या मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार सुरु केले होते. उपचाराला चांगला प्रतिसादही मिळत होता. पण काल अचानक आशुतोषने टोकाचं पाऊल उचलून, सर्वांना दु:खाच्या खाईत ढकलून दिलं.

नांदेड शहरात अभिनेता आशुतोष भाकरेचं घर आहे. गेल्या काही दिवसांपासून आशुतोष आणि अभिनेत्री मयुरी देशमुख इथेच राहत होते. आशुतोष आणि मयुरी यांचा 4 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आशुतोष आणि मयुरी हे दोघेही सुखवस्तू कुटुंबातील. दोघांनाही कलाक्षेत्राची मोठी आवड. दोघांची आवड एकच असल्याने दोघांचा संसारही सुखात सुरु होता.

आशुतोषचं करिअर

आशुतोषने अभिनेता भारत जाधवसोबत ‘इच्चार करा पक्का’ या मराठी चित्रपटात सहकलाकाराची भूमिका केली होती. त्यानंतर त्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सांगणाऱ्या भाकरी या मराठी चित्रपटात नायकाची भूमिका केली होती. हळूहळू आशुतोष दिग्दर्शन क्षेत्राकडेही वळला होता.

आशुतोषची पत्नी मयुरी देशमुख ही खुलता कळी खुलेना या टीव्ही सीरियलमुळ घराघरात पोहोचली. पती-पत्नी दोघेही मुंबईला स्थायिक होते. मागच्या महिन्याभरापूर्वी हे कलावंत दाम्पत्य नांदेडला घरी आलं. नांदेडमधील गणेश नगर इथल्या घरी मयुरी आणि आशुतोषची आई घरात गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी आशुतोष वरच्या खोलीत होता. बराचवेळ झाला आशुतोष खाली आला नाही. त्यावेळी त्याचा दरवाजा ठोठावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने, दुसऱ्या बाजूने खोलीत डोकावून पाहिलं. त्यावेळी आशुतोष लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि एकच थरकाप उडाला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

आशुतोषच्या कुटुंबियांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आशुतोषच्या मागे आई-वडील, पत्नी आणि सध्या विदेशात शिकत असलेला 1 लहान भाऊ असा परिवार आहे. आशुतोषच्या अचानक जाण्याने परिवाराला मोठा धक्का बसला आहे. नेमकं काय घडलं असावं याबद्दल कुणालाही काहीही सांगता येत नाही.

(Aashutosh Bhakre suicide update)

संबंधित बातम्या 

Ashutosh Bharke Suicide | अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीचा नांदेडमध्ये गळफास   

ना मतभेद, ना आर्थिक चणचण, मयुरीचा पती आशुतोषच्या आत्महत्येचं कारण काय.? 

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.