आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, भारतानं चीनला ठणकावलं

लडाख आणि जम्मू-कश्मीर हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत. आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नये, अशा शब्दात भारतानं चीनला ठणकावलं आहे.

आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नका, भारतानं चीनला ठणकावलं
Follow us
| Updated on: Oct 15, 2020 | 6:40 PM

नवी दिल्ली : लडाख आणि जम्मू-कश्मीर हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग आहेत. आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये नाक खुपसू नये, अशा शब्दात भारतानं चीनला ठणकावलं आहे. अरुणाचल प्रदेशही भारताचा भाग असून यापूर्वी अनेकदा उच्चस्तरीय चर्चांमध्ये चीनसमोर स्पष्ट करण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. (MEA spoke person told to china that Jammu Kashmir and Ladakh is integral part of India)

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी भारत-अमेरिका चर्चा, विदेशात काम करणारे उच्चायुक्त यांच्यासाठी सुषमा स्वराज व्यख्यानमालेची सुरूवात याबद्दल माहिती दिली. या पत्रकार परिषदेत चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना श्रीवास्तव यांनी ठणकावलं. भारताकडून म्यानमारच्या नौदलासाठी पाणबुडी देण्यात येणार असल्याबद्दल माहिती दिली.

पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी भारताच्या अंतर्गत विषयावरून टीका करत असल्याचे समोर आले होते. त्या अधिकाऱ्यांना देखील श्रीवास्तव यांनी टीका केली. पाकिस्तान त्यांच्या देशातील अपयश लपवून तेथील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भारतावर टीका करते. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताच्या अंतर्गत मुद्यांमध्ये लक्ष घालायचं सोडून त्यांच्या देशातील सरकारला सल्ले द्यावेत, असे प्रत्युत्तर श्रीवास्तव यांनी दिले.

भारत सरकार म्यानमारच्या नौदलासाठी आईएनएस सिंधूवीर पाणबुडी देणार आहे. म्यानमारच्या नौदलातील ही पहिली पाणबुडी असेल.

सुषमा स्वराज व्याख्यानमालेचे आज उद्धाटन करण्यात आले. भारतातील विदेशातील उच्चायुक्त कार्यालयात सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 45 जण सहभागी झाले होते.

संबंधित बातम्या :

“हाय अलर्टवर राहा आणि युद्धाची तयारी करा”, चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचा सैन्याला आदेश

भारतानं सीमा भागात सुरू केलेल्या ‘या’ कामामुळं चीनचा जळफळाट

(MEA spoke person told to china that Jammu Kashmir and Ladakh is integral part of India  )

मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.