लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही

लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांवरील महागडी औषधे मिळणे (Medicine not available Maharahstra Lockdown) कठीण झाले आहे.

लॉकडाऊनमुळे मधुमेह, रक्तदाबावरील औषधांचा तुटवडा, शस्त्रक्रिया झालेल्यांनाही औषध नाही
Follow us
| Updated on: Apr 01, 2020 | 7:03 PM

जळगाव : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने (Medicine not available Maharahstra Lockdown)  देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही ठप्प आहे. वाहतूक व्यवस्थाही देखील प्रभावित झाल्याने जळगावमध्ये औषधांचा तुटवडा भासत आहे. लॉकडाऊनमुळे अन्य शहरांसह राज्यांमधून येणारा औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे आता दुर्धर आजारांवरील महागडी औषधे मिळणे कठीण झाले आहे.

गेल्या आठवड्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात (Medicine not available Maharahstra Lockdown) आली होती. लॉकडाऊननंतर काही दिवसात त्याचे विपरीत परिणाम जाणवत आहेत. जळगावमध्ये मधुमेह, रक्तदाब यासारख्या अनेक गंभीर स्वरुपाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. तसेच मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपण, कर्करोग, पक्षघाताची मोठी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनाही आवश्यक औषध मिळत नसल्याचे समोर आलं आहे.

स्थानिक बाजारपेठेतील अनेक मेडिकलमध्ये औषधांचा साठा संपला आहे. नवीन मागणी नोंदवूनही औषधांचा पुरवठा कंपन्यांकडून होत नाही. त्याशिवाय औषधी कंपन्यांच्या उत्पादनावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. कंपन्यांमध्ये लॉकडाऊनपूर्वी उत्पादित झालेला साठाही वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने स्थानिक पातळीपर्यंत पुरवण्यात अडचणी येत आहे.

नामांकित मेडिकलमध्येही औषधं नाही

अनेक गरजू रुग्णांना वेळेवर औषधं मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील नामांकित मेडिकल्समध्ये देखील आवश्यक ती औषधे इतर सामुग्री मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनला सुरुवात झाल्यानंतर काही लोकांनी खबरदारी म्हणून आवश्यक ती औषधे गरजेपेक्षा अधिक प्रमाणात घेऊन ठेवली आहे. त्यामुळे देखील काही औषधे संपली आहेत.

औषधांचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्णांची होणारी अडचण लक्षात घेऊन काही मेडिकल चालक मागणी नोंदवून घेत आहेत. त्यानंतर जसजसा औषधांचा साठा उपलब्ध होत आहे, तसा तो मागणीनुसार रुग्णांना पुरवत (Medicine not available Maharahstra Lockdown) आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.