जेजे, कामा, जीटी, सेंट जॉर्ज रुग्णालयात औषध पुरवणार नाही, 60 कोटींच्या थकबाकीने विक्रेत्यांचा निर्णय
राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनी आता औषध पुरवठ्यावर बंदी घातली (Medicine supply ban in government hospital) आहे.

मुंबई : राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनी आता औषध पुरवठ्यावर बंदी घातली (Medicine supply ban in government hospital) आहे. सरकारी रुग्णालयांनी कोट्यवधी रुपयांची थकबाकी केली आहे. राज्य सरकारच्या देखरेखी खाली चालणाऱ्या जे जे, कामा, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयाने तब्बल 60 कोटी रुपयांचती थकबाकी केली (Medicine supply ban in government hospital) आहे.
सरकारी रुग्णालयात औषध पुरवठा बंद
राज्य सरकार तर्फे मुंबईमध्ये संचलित होणारे 4 मोठे रुग्णालय आहेत. ज्यामध्ये जे जे ,कामा, जीटी आणि सेंट जॉर्ज सारख्या मोठ्या रुग्णालयांनी तब्बल 60 कोटी रुपये थकवले आहेत.
“रुग्णालयाकडून आम्हाला जितके औषधांचे ऑर्डर मिळाले तितकी सर्व औषध आम्ही पुरवली. पण औषधांच्या पेमेंटकरीता रुग्णालय टाळाटाळ करत आहेत. याबाबत आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलीस सर्व प्रकरणावर चौकशी करतील”, असं ऑल इंडिया फूड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनने सांगितले.
“पाच महिन्यापूर्वी मी डीन म्हणून चार्ज घेतलाआहे. वर्क ऑर्डर थकबाकी 2013 पासून दिसत आहे”, असं जेजे रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी यांनी सांगितले.
“90 टक्के औषधे त्यांना हॉफकीनकडून मिळतात. काही जास्त अर्जन्ट असेल त्यावेळी मात्र लोक चिठ्टीवरुन औषधे खरेदी करतात”, असंही डॉ. पल्लवी यांनी सांगितले.
दरम्यान, औषध पुरवठा बंद असणार आहे तर रुग्णांची काय अवस्था होणार आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.