चित्रपट महामंडळाच्या बैठकीत राजीनामा नाट्य, मेघराज राजेभोसलेंचा राजीनाम्यास नकार, सदस्यांनी निवडला प्रभारी अध्यक्ष

| Updated on: Nov 26, 2020 | 8:10 PM

मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी राजीनामा नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. (Marathi Chitrapat Mahamandal)

चित्रपट महामंडळाच्या बैठकीत राजीनामा नाट्य, मेघराज राजेभोसलेंचा राजीनाम्यास नकार, सदस्यांनी निवडला प्रभारी अध्यक्ष
Follow us on

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत गुरुवारी राजीनामा नाट्य रंगलेलं पाहायला मिळालं. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले (Meghraj Raje Bhosale) यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला. त्यानंतर कार्यकारिणीने मतदान घेऊन महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून धनाजी यमकर यांची निवड केली. या सर्व प्रकारामुळे राजेभोसले यांनी संताप व्यक्त केला आहे. मी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. नव्या अध्यक्षाची निवड बेकायदेशीर असून महामंडळाला कोर्टात खेचणार असल्याचा इशारा राजेभोसले यांनी दिला. (meeting of the Akhil Bhartiy Marathi Chitrapat Mahamandals executive committee)

मेघराज राजे भोसलेंचा राजीमाना देण्यास नकार 

गुरुवारी (26 नोव्हेंबर) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आयोजित बैठकी एकूण 12 संचालकांपैकी 8 संचालकांनी विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी मेघराज राजेभोसले यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. यावेळी बैठकीत गोंधळ उडाला.

लवकरच मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड

मेघराज राजेभोसले यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे मंडळातर्फे मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी मतदान प्रक्रियेनंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली. तसेच, ‘येत्या काही दिवसांत कार्यकारिणीची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड केली जाईल,’ अशी माहिती धनाजी यमकर यांनी दिली.

बेकायदेशीर बैठक घेणाऱ्यांना कोर्टात खेचणार

दरम्यान, मेघराज भोसले यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यांनतर ते आक्रमक झाले आहेत. “मी राजीनामा दिलेला नाही. जे कुणी बेकायदेशी बैठक घेतील त्यांनी मी कोर्टात खेचणार आहे.” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, ‘अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनीदेखील विरोधकांना साथ दिली हे दुर्देवी आहे. ज्या धनाजी यमकर यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यांना प्रभारी अध्यक्ष केलं. हे चुकीचं आहे,’ अशी टीका त्यांनी धनाजी यमकर यांच्या निवडीबद्दल केली.

संबंधित बातम्या :

…तर मालिकांच्या चित्रीकरणास मनसे ठामपणे विरोध करेल : अमेय खोपकर

Ashalata Wabgaonkar | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन, मालिकेच्या शुटींगदरम्यान लागण

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणं यापेक्षा दुसरा विनोद नाही : राजू शेट्टी

(meeting of the Akhil Bhartiy Marathi Chitrapat Mahamandals executive committee)