Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, आमदार गंभीर जखमी

मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या गाडीला (Shivsena MLA accident) अपघात झाला आहे.

शिवसेना आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, आमदार गंभीर जखमी
Follow us
| Updated on: Jan 11, 2020 | 10:58 AM

बुलडाणा : मेहकर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या गाडीला (Shivsena MLA accident) अपघात झाला आहे. या अपघातात संजय रायमूलकर यांच्यासह त्यांचा चालक आणि एक बॉडीगार्ड गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी औरंगाबादला हलवण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मेहकर विधानसभा मतरदारसंघाचे शिवसेना आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या गाडीला नायगाव दत्तपूर गावाजवळ अपघात झाला आहे. या अपघातात आमदार रायमुलकर यांच्यासह त्यांच्या गाडीचा चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यासोबतच रायमुलकर यांचे बॉडीगार्डही गंभीर जखमी झाले आहे.

रायमुलकर यांची गाडी मेहकरकडे येत असताना त्यांच्या इकोस्पोर्ट गाडीची आणि मेटॅडोरची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यात आमदारांची गाडी पलटी झाली. त्यासोबतच मेटॅडोर ट्रकही पलटी झाला.

दरम्यान सध्या आमदार संजय रायमुलकर, चालक पंजाम गुडधे आणि बॉडीगार्ड ज्ञानेश्वर निकस यांचा गंभीर जखमींमध्ये समावेश आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शिवसैनिकांसह रायमुलकर यांच्या कार्यकर्त्यांनी मेहकरच्या मल्टी हॉस्पिटलमध्ये गर्दी (Shivsena MLA accident) केली.

'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड
'छावा' पाहून पसरली अफवा अन् औरंगजेबाचा खजिना लुटण्यासाठी झुंबड.
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?
हरिणाच्या मटणासाठी मारहाण, धसांचा कार्यकर्ता 'खोक्या'ची दहशत; काय घडल?.
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या
अश्लील चाळे करणाऱ्याचे वडील म्हणाले; लाज वाटते, त्याने लघुशंका माझ्या.
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं
'भुजबळ सडलेल्या डोक्याचा, तो स्वप्न बघून मरेल पण...', जरांगेंनी डिवचलं.
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे
पुण्यातील या घटनांमुळे संताप! कुठे अश्लील चाळे,कोयत्यानं हल्ला तर कुठे.
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'
'त्या' प्रकारावरून रूपाली ठोंबरे आक्रमक, 'जसं काय त्याच्या बापाचा...'.
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले
पुण्यातील तरूणाच्या अश्लील चाळ्यांवरून वसंत मोरे पोलिसांवरच भडकले.
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
'टूरिस्ट म्हणून येतात अन्...', एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका.
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच..
बड्या बापाच्या लेकाचे भरचौकात अश्लील चाळे, BMW त बसून स्त्रियांसमोरच...
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला
पंकजा मुडेंचं रडगाणं, वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा,वडेट्टीवारांचा टोला.