आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार

मर्सिडीज-बेंझ इंडियाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. मर्सिडीज आता महाराष्ट्रातील चाकण येथील प्लान्टमध्ये AMG कार्सचं असेंबलिंग करणार आहे.

आत्मनिर्भर भारत! मर्सिडीजच्या कार महाराष्ट्रात असेंबल होणार
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 8:25 PM

मुंबई : मर्सिडीज-बेंझ इंडियाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. मर्सिडीज आता महाराष्ट्रातील चाकण येथील प्लान्टमध्ये AMG कार्सचं असेंबलिंग करणार आहे. भारतात 2020 पासून फक्त ‘बीएस-6’ इंधनयुक्त गाड्या विकल्या जातील, असा निर्णय सरकारने घेतल्यानंतर मर्सिडीज कंपनीदेखील या नियमांचे पालन करत चाकण येथे गाड्या असेंबल करुन विकणार आहे. (Mercedes Benz india announces local assembly of AMG cars in Chakan Maharashtra)

मर्सिडीज बेंझने भारतात एएमजी परफॉर्मन्स गाड्या पहिल्यांदा 2010 साली सादर केल्या. परंतु त्यावेळी मर्सिडीजच्या सर्व गाड्या सीबीयू म्हणजेच कंप्लीटली बिल्ट यूनिट रुटसह येत होत्या. आपल्या सरकारने त्यावर लावलेल्या टॅक्सनंतर त्यावर 100 टक्के आयात शुल्क आकारलं जातं.

दरम्यान, स्थानिक उत्पादन आणि असेंबलिंगला प्रोत्साहित करण्यासाठी भारतीय सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळेच मर्सिडीजने त्यांच्या एएमजी गाड्यांची रेंज भारतात असेंबल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मर्सिडीज एएमजी त्यांच्या परफॉर्मन्स डिव्हिजनमुळे अधिक प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत भारतात जितक्या मर्सिडीज बेंझ गाड्या विकल्या जातात त्या गाड्यांना एएमजीकडून जोरदार टक्कर मिळू शकते. परंतु किमतीच्या बाबतीत या कार तीनपट महाग आहेत.

एएमजी गाड्या पॉवरफुल्ल असतात आणि त्या रेसट्रॅकवर कधीही दिसू शकतील. सध्या भारतात मर्सिडीजचे 8 एएमजी मॉडेल्स उबलब्ध आहेत. यामध्ये GLC43 ते S63 पर्यंतच्या मॉडेल्सचा समावेश आहे. यामध्ये मर्सिडीज AMG-GT या कारचंदेखील नाव आहे.

कंपनीने याबाबत म्हटलं आहे की, नुकतीच लाँच झालेली मर्सिडीज-एएमजी जीएलसी 43 ही कार भारतात असेंबल केली जाणार आहे. या कारला भारतात मोठी मागणी आहे. ही कार भारतात सर्वाधिक विकली जाणारी एएमजी कार आहे. दरम्यान, जीएलसी 43 नंतर कोणती कार भारतात असेंबल होईल, याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.

संबंधित बातम्या

BMW ची सर्वात किफायतशीर सेडान लाँच, किंमत फक्त…

SUV सेगमेंटमध्ये मारुतीचा धडाका; पाच शानदार कार लाँच होणार

दिवाळीत कार खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग ‘या’ पाच कार बघाच!

होंडाची शानदार H’Ness CB 350 बाईक भारतात लाँच, किंमत फक्त…

(Mercedes Benz india announces local assembly of AMG cars in Chakan Maharashtra)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.