सुरतमधील व्यापाऱ्याकडून ‘I Support Kangana Ranaut’ नावाची नवी साडी लाँच

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे देशभरात सर्वत्र कंगनाची जोरदार चर्चा सुरु आहे (Kangana Ranaut Printed Saree Surat).

सुरतमधील व्यापाऱ्याकडून 'I Support Kangana Ranaut' नावाची नवी साडी लाँच
Follow us
| Updated on: Sep 13, 2020 | 7:59 PM

अहमदाबाद : सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे देशभरात सर्वत्र कंगनाची जोरदार चर्चा सुरु आहे (Kangana Ranaut Printed Saree Surat). याच पार्श्वभूमीवर गुजरातमधील सुरत येथील एका व्यापाऱ्याने आता कंगनाच्या फोटोचा वापर करुन एक प्रिंटेड साडी तयार केली आहे. या साडीवर “I Support Kangana Ranaut” असं लिहिलेलं आहे. सध्या या साडीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे (Kangana Ranaut Printed Saree Surat).

कंगना आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादानंतर कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.  त्यामुळे कंगनाचे चांगलेच नुकसान झाले आहे. मात्र मुंबई हायकोर्टाकडून या कारवाईवर स्थगिती देण्यात आली. पण यादरम्यान देशभरातील प्रत्येक वर्गातून कंगनाच्या समर्थनात अनेक लोक आवाज उठवत आहेत.

कंगनाच्या समर्थनासाठीच सुरतमधील एका साडी व्यापाऱ्याने कंगनाचा मणिकर्णिका चित्रपटातील फोटोचा वापर करत एक आगळी वेगळी साडी तयार केली आहे. गुजरातच्या सुरत येथील रजत डावर यांनी ही साडी तयार केली आहे. रजत जावर यांनी साडीच्या पदरावर मणिकर्णिका चित्रपटातील फोटोचा वापर करत I Support Kangana Ranaut असं लिहिलेलं आहे.

गुजरातमधील आलिया फेब्रिक्स प्रीमिअम फॅन्सी फेब्रिक्ससाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडच्या डिझायनरमध्ये हा व्यापारी लोकप्रिय आहे. आलिया फेब्रिक्सचा व्यापार मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चैन्नईमध्ये प्रसिद्ध आहे. नुकतेच बॉयकॉट चायना ही मोहिम सुरु होती, तेव्हा पण या व्यापाऱ्याने सहभाग घेत बॉयकॉट चायना नावाच्या साड्या तयार केल्या होत्या.

सुरतमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या साड्या तयार केल्या आहेत. सुरतमधील व्यापारी देशभरातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा आधार घेत साड्या छापतात. सुरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियंका गांधी यांचीही प्रिंटवाली साडी सर्वत्र प्रसिद्ध झाली होती. तसेच येथील कपडा बाजारात स्वच्छता मिशन, कोरोना जागृती अभियान इतर जनजागृती संदेशच्या साड्याही तयार केल्या होतात.

“महाराष्ट्र सरकारने एका महिलेच्या विरोधात एकत्र येऊन त्यांच्या घरावर जी कारवाई केली ती अयोग्य आहे. त्यांना मुंबईत येऊ न देण्याची धमकी देणे. हे सर्व आम्हाला अयोग्य वाटत आहे. पण कंगनाने हिम्मत दाखवून एकटी प्रशासनासोबत लढली. त्यामुळे आम्ही प्रेरित झालो. त्यानंतर आम्ही कंगना रनौतला समर्थन देण्यासाठी I Support Kangana Ranaut असं लिहिलेली साडी प्रिंट करण्याचा विचार आला”, असं सुरतमधील व्यापाऱ्याने सांगितले.

संबंधित बातम्या :

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस

Kangana Ranaut Rajbhavan | राज्यपाल कोश्यारींना माझ्यावरील अन्यायाविषयी सांगितले, कंगना रनौत राजभवनावर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.