Maratha Reservation | मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका: अशोक चव्हाण

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. (Ashok Chavan said  Maratha reservation case should hear before Constitution Bench in Supreme Court)

Maratha Reservation | मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका: अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 8:01 PM

औरंगाबाद : मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. मात्र, मराठा आरक्षण रद्द झालेले नाही त्याला स्थगिती मिळाली आहे, असं चव्हाण यांनी म्हटले. (Ashok Chavan said  Maratha reservation case should hear before Constitution Bench in Supreme Court)

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे. ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केल्यात त्यांच्या 8 ते 10 याचिका कोर्टात प्रलंबित आहेत, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने जोर लावायचा म्हणजे काय करायचं?, असा सवाल चव्हाण यांनी विचारला. उद्याची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी ज्या बेंचने स्थगिती दिली त्यांच्यासमोर न होता ती दुसऱ्या बेंचसमोर घेण्यात यावी, अशी विनंती करणार असल्याचे अशोक चव्हाणांनी सांगितले.

मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हायला पाहिजे, ही फक्त सरकाची नाही तर सर्व याचिकाकर्त्यांची भूमिका आहे. ज्या बेंचनं स्थगिती दिली त्याबेंचसमोर पुन्हा जाण्याची आमची भूमिका नाही. मराठा आरक्षणावरुन आम्हाला कोणतेही राजकारण करायचे नाही. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात मंजुरी मिळावी ही आमची ठाम भूमिका आहे. हा प्रश्नी लवकर मार्गी लागला पाहिजे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचंय : संभाजीराजे

दरम्यान, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाजही माझाच आहे. मला त्यांच्याशीही बोलायचं आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे, असं सांगतानाच मला मराठा आणि बहुजन समाजाचा शिपाई व्हायचं आहे, असे उद्गार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जालना येथे काढले.

संबंधित बातम्या :

Jalana | जालना शहरात राज्यस्तरीय मराठा आरक्षण जागरण परिषद

Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारकडून सावळा गोंधळ : विनायक मेटे

(Ashok Chavan said  Maratha reservation case should hear before Constitution Bench in Supreme Court)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.