नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात 36 हजार 659 कोटी रुपये लाभार्थींच्या खात्यात थेट जमा दिल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय 19.86 कोटी महिला लाभार्थ्यांच्या जन-धन खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहेत. (Ministry of Finance Transfers to beneficiaries during COVID19 lockdown)
16.01 कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम किंवा पीएफएमएस) च्या माध्यमातून ‘डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर’ने (डीबीटी) 36 हजार 659 कोटींपेक्षा अधिक रक्कम हस्तांतरित केल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊन काळात ही रक्कम थेट बॅंक खात्यात जमा करण्यात आली आहे.
रोख लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्याने मध्यस्थाकडून गळतीची शक्यता दूर होते आणि कार्यक्षमता सुधारते.
More than Rs 36,659 Crore transferred by using Direct Benefit Transfer (DBT) through Public Financial Management System (PFMS) in the Bank accounts of 16.01 crore beneficiaries during #COVID19 lockdown: Ministry of Finance pic.twitter.com/oJghoOadla
— ANI (@ANI) April 19, 2020
‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’ अंतर्गतही काही रक्कम देण्यात आली. महिला खातेदारांच्या जन-धन खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहेत. 13 एप्रिलपर्यंत एकूण महिला लाभार्थ्यांची संख्या 19.86 कोटी होती. अशाप्रकारे 9 हजार 930 कोटी रुपये वितरित झाल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं.
‘कोरोना’मुळे भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या विविध मुदतवाढीचा करदात्यांना पूर्ण लाभ घेता यावा, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या रिटर्न (परतावा) फॉर्ममध्ये बदल करत आहे महिन्याच्या शेवटी याविषयी अधिसूचित केले जाईल.
Payments were also made under Pradhan Mantri Garib Kalyan Yojana. Rs 500 was credited in women account holder’s Jan-Dhan accounts. Till 13.04.2020 total number of women beneficiaries were 19.86 crores, which resulted in disbursement of Rs 9,930 crores: Ministry of Finance https://t.co/TT4G9jODyX
— ANI (@ANI) April 19, 2020