Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्थलांतरित मजुरांना आंतरराज्य प्रवासाला बंदी, रोजगारासाठी केंद्राच्या राज्यांना सूचना

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह (labour Cant Traveled from one state to another) मंत्रालयाने मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी घातली आहे.

स्थलांतरित मजुरांना आंतरराज्य प्रवासाला बंदी, रोजगारासाठी केंद्राच्या राज्यांना सूचना
Follow us
| Updated on: Apr 19, 2020 | 5:23 PM

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय गृह (labour Cant Traveled from one state to another) मंत्रालयाने मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास बंदी घातली आहे. नुकतंच गृह मंत्रायलाने याबाबतची एक मार्गदर्शक सूचना जारी करत सर्व राज्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहे. तसेच जे मजूर ज्या  कोणत्याही राज्यात अडकले आहेत, त्यांनी तिथेच राहावं, असेही या परिपत्रकात म्हटलं आहे.

स्थानिक  सरकाने राज्यात त्यांना काम उपलब्ध करुन द्यावं, असेही या नमूद करण्यात आलं आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यान कोणालाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.

कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्थलांतरित मजूर (labour Cant Traveled from one state to another) पायी चालत आपापल्या गावी निघाले होते. या पार्श्वभूमीवर नुकतंच केंद्र सरकारच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर स्थलांतरित मजुरांबाबत केंद्र सरकारकडून निर्देश जारी करण्यात आले.

यानुसार, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कोणत्याही मजुरांना राज्याच्या बाहेर पाठवता येणार नाही. त्या मजुरांनी त्या ठिकाणी राहूनच काम करावे. तसेच जे मजूर मदत केंद्रात आहे. त्यांच्या कौशल्यांचा वापर करुन घ्यावा, असेही यात नमूद केलं आहे.

या मजुरांना शेती, बांधकाम, निर्मिती, रोजगार हमी या योजनेच्या कामासाठी काम करता येऊ शकतं. मात्र सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचे नियम पाळून करता येणार असेही यात म्हटलं आहे.

ज्यांना त्यांच्या मूळ कामाच्या ठिकाणी जायचं असल्यास, त्यांची आरोग्य तपासणी करुन कामाच्या ठिकाणी पाठवता येणार आहे, असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले.

दरम्यान राज्यातील मजुरांना कामावर जाण्याची परवानगी देण्यात आली असून तरी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात मजूर वाहतुकीस बंदी घालण्यात आली  (labour Cant Traveled from one state to another) आहे.

केंद्राच्या सहकार्यानं महाराष्ट्रात अडकलेल्या मजुरांना घरापर्यंत पोहोचवू, उद्धव ठाकरेंचा शब्द

स्वातंत्र्य आणि मोकळेपण देण्यास सरकार अनुकूल आहे. मात्र सद्यस्थितीत बंधनाशिवाय पर्याय नाही. स्थलांतरित मजूर आता शांत झाले आहेत. मजुरांसंबंधी केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु आहे. लवकरच केंद्राशी बोलून निर्णय होईल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थलांतरित मजुरांना आश्वस्त केले.

महाराष्ट्र सरकार तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवेल. घरी जाल तेव्हा आनंदाने जा, भीत भीत नको. काही दिवसांचाच तर सवाल आहे, हेही दिवस जातील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.