मिरा भाईंदरमध्ये दीड वर्षाचा मुलगा कोरोनामुक्त, एका दिवसात 15 जणांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (Mira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आहे.
ठाणे : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (Mira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आ राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मिरा भाईंदरला मात्र (M ira Bhayandar Corona Patient Discharge) दिलासा मिळाला आहे. हे. मिरा भाईंदरमध्ये काल (27 एप्रिल) संध्याकाळी जवळपास 15 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या सर्वांना काल संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आतापर्यंत मिरा भाईंदर मध्ये 41 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
मिरा भाईंदरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Mira Bhayandar Corona Patient Discharge) आहे. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र काल रुग्णालयातून एका वेळी तब्बल 15 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यात दीड वर्षाच्या मुलापासून ते 60 हून अधिक वय असलेल्यांचाही समावेश आहे. काल बरे झालेल्या पाच वयोवृद्धांसह दोन लहान मुलांचा समावेश आहे. वयोवृद्ध लोकांमधील सर्वांचे वय हे 60 वर्षाहून अधिक आहे. या सर्वांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे.
मिरा भाईंदर रुग्णांचा आकडा 145 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील 102 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी 19 एप्रिल ते 23 एप्रिलपर्यंत संपूर्णतः बंद केले होते. यानंतर पुढे 28 एप्रिलपर्यंत हा बंद वाढवला होता. पण तरीही मिरा भाईंदरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.
मिरा भाईंदरमध्ये गेल्या 11 दिवसात 93 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा हा 145 वर पोहोचला आहे. त्यामुळे 28 एप्रिलनंतर यात काही सूट मिळणार की पुन्हा मीरा -भाईंदर संपूर्ण लॉकडाऊन करणार यासकडे सर्वांचे लक्ष लागलं (Mira Bhayandar Corona Patient Discharge) आहे.
संबंधित बातम्या :
Yavatmal Corona Update : काल 27, आज 19, यवतमाळमध्ये तीन दिवसात 55 रुग्ण, बाधितांची संख्या 79 वर
Jalgaon corona update : जळगावात कोरोनाचा पाचवा बळी, जिल्ह्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधित