Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता, प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!

| Updated on: Oct 30, 2020 | 1:52 PM

प्रसिद्ध कादंबरीकार सुरेंद्र मोहन पाठक (Surendra Pathak) यांनी मिर्झापूरच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’ पुन्हा वादात अडकण्याची शक्यता, प्रसिद्ध लेखकाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा!
Follow us on

मुंबई : बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेब सीरीजचे दुसरे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘मिर्झापूर 2’ची सध्या सगळीकडेच चर्चा सुरू आहे. मात्र, ‘मिर्झापूर 2’ (Mirzapur Controversy) प्रदर्शित झाल्यापासून त्याच्यामागे वादांचे शुक्लकाष्ट लागले आहे. आधीचे वाद शमलेले नसतानाच आता आणखी एक नवा वाद उभा राहिला आहे. प्रसिद्ध कादंबरीकार सुरेंद्र मोहन पाठक (Surendra Pathak) यांनी मिर्झापूरच्या निर्मात्यांना कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. (Mirzapur 2 controversy writer surendra Pathak warns makers to take legal action)

‘धब्बा’ या हिंदी कादंबरीचे लेखक सुरेंद्र मोहन पाठक यांनी वेब सीरीजमधील एका दृश्यावर आक्षेप घेतला आहे. एका दृश्यादरम्यान ‘धब्बा’ या कादंबरीचा चुकीचा वापर दाखवला गेला आहे,. जर, त्वरित हे दृश्य हटवले नाही तर, मालिकेचे निर्माते आणि अभिनेते कुलभूषण खरबंदा यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

‘मिर्झापूर 2’ एका दृश्यामध्ये कुलभूषण खरबंदा ‘धब्बाड’ नावाचे पुस्तक वाचताना दिसत आहेत. त्यांच्या हातात पुस्तक असताना बॅकग्राऊंडला काही आक्षेपार्ह ओळींचा व्हॉईओओव्हर ऐकू येतो. या व्हॉईसओवरचा पुस्तकाशी काही संबंध नाही, असा लेखकाचा आरोप आहे. या दृश्यावर आक्षेप घेत, त्यांनी दृश्य हटवण्याची मागणी केली आहे.(Mirzapur 2 controversy writer surendra Pathak warns makers to take legal action)

‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी

‘मिर्झापूर 2’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. एकीकडे या वेब सीरीजची लोकप्रियता वाढत असताना, दुसरीकडे ‘मिर्झापूर’वर बंदीची घालण्याची मागणी (Mirzapur Controversy) केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली होती. ट्विट करत त्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले होते.

‘मिर्झापूर’ वेब सीरीजमधून ‘मिर्झापूर’ची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिर्झापूरच्या खासदार या नात्याने मला हे मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान मोदींना साकडे घातले होते.(Mirzapur 2 controversy writer surendra Pathak warns makers to take legal action)

‘मिर्झापूर 2’ची सोशल मीडियावर हवा!

‘मिर्झापूर 2’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे. कथेत रंजकता आणण्यासाठी यावेळच्या दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकारदेखील दिसले आहेत. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले आहेत. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळाली.

(Mirzapur 2 controversy writer surendra Pathak warns makers to take legal action)