मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हिडीओच्या लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन (Mirzapur 2) नुकताच प्रदर्शित झाला आहे. पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे. कथेत रंजकता आणण्यासाठी यावेळच्या दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकारदेखील दिसले आहेत. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले आहेत. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळाली.(Mirzapur 2 released famous dialogues trending on social media)
‘मिर्झापूर’ची पुढची कथा या पर्वात पाहायला मिळाली आहे. पहिल्या पर्वाच्या शेवटच्या भागात मुन्ना त्रिपाठीने, बबलू पंडित आणि स्वीटी यांना ठार मारले आहे. गुड्डू पंडित आणि गोलू हे दोघे अद्याप जिवंत आहेत. यांच्या जिवंत असण्यामुळेच आता मिर्झापूरमध्ये सुडाच्या भावनेने सगळा गदारोळ माजणार आहे. मुन्ना आणि त्याचे वडील कालीन भैय्या यांच्याकडून गुड्डू पंडित, भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या हत्येचा बदला घेणार आहे.
Kaleen bhaiya ka bulawa aagaya hai, chaliye. #MirzapurOnPrime
?️: https://t.co/fGApeO2Peh @YehHaiMirzapur @excelmovies @TripathiiPankaj @alifazal9 @divyenndu @battatawada @RasikaDugal @HarshitaGaur12 @mrvijayvarma @FarOutAkhtar @ritesh_sid pic.twitter.com/y4ox6TWSG8
— amazon prime video IN (@PrimeVideoIN) October 22, 2020
‘मिर्झापूर 2’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. या वेब सीरीजच्या प्रदर्शनानंतर प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मीम्स आणि डायलॉग पोस्ट करत प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (Mirzapur 2 released famous dialogues trending on social media)
‘मिर्झापूर’प्रमाणेच या पर्वाचे संवाद देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सध्या सोशल मीडियावर या संवादांची चर्चा सुरू आहे.
1) हमारा उद्देश्य एक है… जान से मारेंगे… क्योंकि मारेंगे तभी जी पाएंगे.
2) गद्दी पर चाहे हम बैठें या मुन्ना नियम सेम होगा.
3) आप हम को घर की ओनरशिप सिखा रहे हैं, हमको पूरा मिर्जापुर चाहिए.
4) बातें ज्यादा हुई नहीं, बस आहट लेकर आ गए.
5) शर्मा से क्या शर्माना, दिस इज ए कॉमन डिजीज.
6) औरत चाहे चंबल की हो या पूर्वांचल की, जब गन उठाई है तो इसका मतलब है कि दिक्कत में है.
7) शादीशुदा मर्द को अपनी स्त्री से भय न हो तो इसका मतलब है कि शादी में कुछ गड़बड़ है.
8) दिखाते समय कॉन्फिडेंस हो तो पब्लिक पूछती नहीं कि फाइल में क्या है.
9) जब कुर्बानी देने का टाइम आए तो सिपाही की दी जाती है. राजा और राजकुमार जिंदा रहते हैं , गद्दी पर बैठने के लिए.
10) कुछ लोग बाहुबली पैदा होते हैं और कुछ को बनाना पड़ता है, इनको बाहुबली बनाएंगे
(Mirzapur 2 released famous dialogues trending on social media)