बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर अखेर पुण्यात, पोलिसांसह जयपूरहून परत, 34 दिवसांनी घर गाठणार
पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.
पुणे : गेल्या महिनाभरापासून बेपता असलेले उद्योजक गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) पुण्यात परतले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जयपूरहून पाषाणकरांना पुण्यात आणलं. पुणे पोलिसांना काल तब्बल 34 दिवसांनी जयपुरातील एका हॉटेलमध्ये पाषाणकर सापडले. व्यवसायात आर्थिक नुकसान झाल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून 64 वर्षीय पाषाणकर बेपत्ता झाले होते. (Missing Businessman Gautam Pashankar returns to Pune from Jaipur with Pune Crime Branch Police)
ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे 21 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थानातील जयपूर येथून त्यांना काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. जयपूर येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. आता गौतम पाषाणकर घरी परतल्याने त्यांच्या बेपत्ता होण्याचे नेमके कारण समोर येण्याची चिन्हं आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातून गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. पाषणकर हे बुधवारी 21 ऑक्टोबरला दुपारी लोणी काळभोर परिसरात कामानिमित्त बाहेर पडले होते. तिथून ते पानशेतला कामासाठी जात असल्याचं सांगून गेले. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला होता.
पाषाणकरांचे नातेवाईक, कार चालक आणि ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क न झाल्यानं त्यांची शोधाशोध सुरु झाली. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती.
ड्रायव्हरकडे बंद लिफाफ्यात सुसाईड नोट
गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली सुसाईड नोट सापडली होती. त्यांनी आपल्या ड्रायव्हरकडे बंद लिफाफा दिला होता. घरी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीने उघडून बघितल्यावर त्यात सुसाईड नोट होती. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा उल्लेख या नोटमध्ये करण्यात आला होता. (Missing Businessman Gautam Pashankar returns to Pune from Jaipur with Pune Crime Branch Police)
पाषाणकर यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी वडिलांच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला होता. पाषाणकर यांच्या गायब होण्यात राजकीय व्यक्तीचा हात असल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला होता. पोलिसांची भेट घेऊन त्यांनी काही राजकीय व्यक्तींची नावेही सांगितली होती.
Gautam Pashankar | बेपत्ता उद्योजक गौतम पाषाणकर जयपूरच्या हॉटेलात सापडलेhttps://t.co/7Jv33ti5MF
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या :
पुणे पोलिसांना मोठं यश, सुसाईड नोट लिहून बेपत्ता असलेले गौतम पाषाणकर राजस्थानात सापडले
(Missing Businessman Gautam Pashankar returns to Pune from Jaipur with Pune Crime Branch Police)