पुण्यात मिठाई चोरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक, घरफोडीचे 15 गुन्हे दाखल
मिठाई चोरी करणाऱ्या झुरळ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. झुरळ्या हा एक तडीपार गुंड आहे.
पुणे : मिठाई चोरी करणाऱ्या झुरळ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे (Mithai Thief Arrested). झुरळ्या हा एक तडीपार गुंड आहे. त्याच्याविरोधात तब्बल घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत. हा गुंड तडीपार असूनही त्याने पुण्यात पुन्हा एकदा चोरी करत दुकानातून मिठाई आणि 46 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. पुणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने या चोरट्याला जेरबंद केले (Mithai Thief Arrested).
दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलं आहे. त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आकाश ऊर्फ झुरळया पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या सर्राइत गुन्हेगारचं नाव आहे. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे.
पाटोळे हा तडीपार असून त्याच्यावर खडक आणि समर्थ पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत. 15 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानाचे शटर उचकटून त्याने दुकानातून 48 हजार रुपये रोख रक्कम आणि मिठाई चोरली होती. चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी झुरळ्याचा शोध घेतला. पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली आहे.
50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाईhttps://t.co/ak3wR5zTLu#CrimeNews #PuneCrime #burglary @PuneCityPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 18, 2020
Mithai Thief Arrested
संबंधित बातम्या :
हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; 50 जणांना अटक, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त
मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली