संभाजीराजे पाठिंबा द्या, बारा हत्तींचं बळ मिळेल, गोपीचंद पडळकरांचं पत्र
पाठिंबा दिल्यास समाजाच्या लढ्याला 12 हत्तींचं बळ येईल असही पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.
कोल्हापूर : राज्यात कोरोनाचा धोका एकीकडे वाढत असताना मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही वारंवार समोर येत आहे. धनगर समाजाच्या आरक्षण मागणीला पाठिंबा देण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना विनंती केली आहे. यासाठी पडळकर यांनी पत्र पाठवून पाठिंब्याची विनंती केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. (mla gopichand Padalkar request to Chhatrapati Sambhaji Raje to support Dhangar reservation)
मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रामध्ये मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षणालाही पाठिंबा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. इतंकच नाही तर पाठिंबा दिल्यास समाजाच्या लढ्याला 12 हत्तींचं बळ येईल असंही पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे. आरक्षणाच्या अभ्यासाचा आणि रोखठोक भूमिकेचा धनगर आरक्षणासाठी उपयोग व्हावा अपेक्षा यावेळी पडळकर यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला. त्यानंतर धनगर समाजातूनही आरक्षणासाठी जागोजागी आंदोलन करण्यात आलं. राज्यात धनगर समाजाने आरक्षणच्या मुद्द्यावर जागोजागी आरक्षण केलं. या आंदोलनात पडळकर यांचाही सहभाग होता. पण आंदोलनाला पोलिसांकडून परवाणगी नाकारण्यात आली. त्यामुळे सरकार धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमी दुजाभाव करत असल्याची टीका यावेळी पडळकरांनी केली होती.
धनगर समाजाला घटनेत आरक्षण दिले आहे, ते आरक्षण मिळावे यासाठी जागोजागी आंदोलन करण्यात आलं होतं. जर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गाड्या अडविण्याचा इशाराही धनगर समाजाकडून देण्यात आला होता. त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेत यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती पडळकरांच्या पत्राची दखल घेतात का आणि त्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.
संबंधित बातम्या –
6 ऑक्टोबरला ‘मातोश्री’बाहेर आंदोलन तर 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’; मराठा आंदोलकांचा इशारा
(mla gopichand Padalkar request to Chhatrapati Sambhaji Raje to support Dhangar reservation)
VIDEO : Fast News | शेतीसंदर्भात महत्वाच्या घडामोडी | 2 October 2020https://t.co/Ekwe2Qq9Ox
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2020