कुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. तसंच योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचा देखील वाढदिवस असतो. (Rohit Pawar Facebook Post On Kunti Pawar Birthday)

कुंती, तुझ्या चेहऱ्यावर हास्याचा धबधबा वाहत राहो, रोहित पवारांकडून शुभेच्छा
Follow us
| Updated on: Sep 29, 2020 | 4:04 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आज वाढदिवस आहे. तसंच योगायोग म्हणजे आजच्याच दिवशी त्यांच्या सहचारिणी कुंती पवार यांचा देखील वाढदिवस असतो. रोहित पवार यांनी कुंती यांच्यासाठी खास फेसबुक पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Rohit Pawar Facebook Post On Kunti Pawar Birthday)

प्रत्येक कामात भक्कम साथ देणारी माझी अर्धांगिनी कुंतीचाही आज वाढदिवस आहे. सौ.च्या चेहऱ्यावरचा हा हास्याचा धबधबा असाच वाहत रहावा या शुभेच्छा, अशा शब्दात रोहित पवार यांनी कुंती पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कुंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी भारतीय संस्कृतीचा दाखला देत ‘मेणबत्ती न विझवता आपल्या संस्कृतीनुसार लावलेल्या या दिव्याप्रमाणे तिचं आयुष्य उजळत रहावं व उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावं’, अशी प्रार्थना केली.

https://www.facebook.com/RRPspeaks/posts/1026270554503353

रोहित पवार आणि कुंती पवार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मात्र या वाढदिवसाला रोहित पवार यांनी कार्यकर्ते आणि तरूणांकडे एक खास गिफ्ट मागितलं आहे. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय, असं सांगत आपण ते मला नक्की द्याल, असा विश्वास देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलाय.

रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे मागितलं विशेष गिफ्ट

मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे. बॅनर, बुके, केक याच्यावर खर्च करण्यापेक्षा कोरोनाच्या काळात ज्या अडचणी आपल्या सर्वांसमोर आहेत, त्यावर आपल्याला काय करता येईल, याचा विचार आपल्याला करायचा आहे. सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झालंय. अनेक गरीब मुला-मुलींकडे मोबाईल, लॅपटॉप, कम्युटर नाहीये. अशा मुला-मुलींच्यासाठी काही काही करता येईल का, याचा विचार आपण करूया. असं सांगत मी फक्त तुम्हालाच करायला सांगतोय असं नाही तर मी देखील माझ्या परीने मला जेवढं जमतंय तेवढं करण्याचा प्रयत्न करतोय, असं रोहित म्हणाले. एकंदरित वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम योग्य ठिकाणी गरजू लोकांसाठी खर्च करण्याचं आवाहन रोहित यांनी केलं आहे.

कोण आहेत कुंती पवार?

कुंती या पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सतिश मगर यांच्या कन्या आहेत. नॉटिंगहॅम विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि गुंतवणूक या विषयात त्यांनी पदवी संपादन केली आहे. रोहित-कुंती जोडीला दोन अपत्य आहेत.

रोहित पवारांचा लग्न ठरवण्यात अजितदादांची महत्त्वपूर्ण भूमिका

रोहित पवार आणि कुंती यांचं लग्न ठरवण्यात अजितदादांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे, असं खुद्द रोहित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं. तसंच अजितदादांनी देखील एका कार्यक्रमात गमतीने रोहित पवारांच्या लग्नावरून सतिश मगर यांना टोले लगावले होते.

(Rohit Pawar Facebook Post On Kunti Pawar Birthday)

संबंधित बातम्या

मोदींच्या वाढदिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करणे खेदजनक : रोहित पवार

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.