जालन्यात मनसेचं खळखट्याक, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन वीजवितरणाच्या कार्यालयाची तोडफोड

जालन्यात वीजवितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे (MNS Protest in Electricity office in Jalana).

जालन्यात मनसेचं खळखट्याक, वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन वीजवितरणाच्या कार्यालयाची तोडफोड
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 4:08 PM

जालना : जालन्यात वीजवितरण कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे (MNS Protest in Electricity office in Jalana). वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी अंबड येथील वीजवितरण कार्यालय मनसेकडून फोडण्यात आले. राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वाढीव वीज बिल आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत (MNS Protest in Electricity office in Jalana).

मनसेच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांनी खुर्च्या टेबल फेकून तोडफोड केली आहे. तसेच खिडकीच्या काचाही फोडल्या आहेत. त्यामुळे वीजवितरण कार्यालयाचे नुकसान झाले आहे. महावितरणकडून अद्याप याविषयींची तक्रार देण्यात आली नाही. मनससेने यापूर्वी महावितरण कार्यालयात वीज बिल माफ करण्यासाठी निवेदन दिले होते.

मनसेचं पुण्यात आंदोलन

लॉकडाऊन काळात आलेल्या वाढीव विज बिलामुळे नागरिक हैराण झाले आहेत. याप्रकरणी 11 ऑगस्टला मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील महावितरणाच्या कार्यालयात खळळखट्याक आंदोलन करत तोडफोड करण्यात आली होती. यावर नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया देत कारवाईचा इशाराही दिला होता. जर मनसेने तोडफोड केली असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई करावी लागेल. कोणत्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान केलं तर कारवाई होते, असे नितीन राऊत म्हणाले होते.

घराचं वीज बिल 40 हजार, नागपुरात व्यक्तीची आत्महत्या

नागपूरमध्ये लॉकडाऊनमधील केवळ घरगुती वापराचं वीज बिल चक्क 40 हजार रुपये आलेल्या व्यक्तीने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

लीलाधर गायधने असं या व्यक्तीचं नाव आहे. वारंवार MSEB च्या कार्यालयात हेलपाटे मारुनही दिलासा न मिळाल्याने गायधने यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. लीलाधर गायधने हे एका खासगी ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते.

संबंधित बातम्या :

Electricity bill | महावितरण ग्राहक आहे, मनसेने वीज बिल माफ करण्याबाबत केंद्राला विचारावे : नितीन राऊत

Electricity Bill | घराचं वीज बिल 40 हजार, MSEB च्या फेऱ्या मारुनही कपात नाही, जाळून घेत आत्महत्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.