मुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात

मुंबईनंतर पुण्यातही मनसेने बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं (MNS Bangladeshi Search Campaign Pune) आहे.

मुंबईनंतर पुण्यातही मनसेचं बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन, आठ संशंयित कुटुंब ताब्यात
Follow us
| Updated on: Feb 22, 2020 | 12:45 PM

पुणे : मुंबईनंतर पुण्यातही मनसेने बांगलादेशी घुसखोरांविरोधात सर्च ऑपरेशन सुरु केलं (MNS Bangladeshi Search Campaign Pune) आहे. सातारा रस्त्यावरील धनकवडी परिसरात मनसैनिकांनी पोलिसांसोबत घेत सर्च ऑपरेशन केलं. यावेळी पुण्यातील मनसे अधिकाऱ्यांनी आठ संशयित बांगलादेशी कुटुंबियांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित बांगलादेशींना चौकशीसाठी सहकारनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे दोन मतदानपत्र आढळून आले.

“जर हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही, तर आम्ही मनसे स्टाईलने आंदोलन करु,” असा इशारा मनसे शहरप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला (MNS Bangladeshi Search Campaign Pune) आहे.

मुंबईतही बांगलादेशी घुसखोर

दरम्यान 13 फेब्रुवारीला मनसेने मुंबईत बोरीवली पूर्व चिकूवाडी या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांविरोधात आंदोलन केलं होतं. या ठिकाणी बांगलादेशी राहत असल्याचा दावा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानुसार मनसेने झोपडपट्टी परिसरात शोध मोहीम राबवत लोकांची चौकशी केली. त्यावेळी त्यांची कागदपत्रही तपासली. त्यांचा पेहराव आणि बोली भाषा बांगलादेशींसारखी असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशी लोकांकडे आधारकार्ड आणि मतदार ओळखपत्र आढळले होते. कामाच्या शोधात कोलकाता, ओदिशामधून मुंबईत आल्याचं बोललं जात होतं. त्यांना मोलमजुरी करून दिवसाकाठी त्यांना 350 ते 400 रुपये मजुरी मिळते. पोलिसांना यात काही बालमजूरही आढळले (MNS Bangladeshi Search Campaign Pune) होते.

संबंधित बातम्या : 

बांगलादेशी घुसखोरांच्या शोधात मनसेची धाड, बोरीवलीत झोपडपट्ट्यांत शोध मोहीम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.